Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Delhi Assembly Election : दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? केजरीवालांनी फोडलं नाव

Arvind Kejriwal Political News Delhi Pravesh Verma AAP and BJP in Delhi : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही.

Rajanand More

New Delhi : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केलेले असताना अद्याप भाजपला एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. तसेच भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. पण आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीच भाजपचा चेहरा कोण असेल, याबाबतचे सुतोवाच केले आहे.

केजरीवालांनी दिलेल्या माहितीनुसार, सुत्रांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपकडून प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाणार आहे. दिल्लीतील जनता अशा व्यक्तींना आपले मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील का, असा प्रश्नही केजरीवालांनी उपस्थित केला आहे. त्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रवेश वर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

प्रवेश वर्मा हे भाजपचे माजी खासदार आहेत. ते दोनदा दिल्लीतून संसदेत गेले होते. केजरीवालांसह सर्वच आप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आतिशी म्हणाल्या, प्रवेश वर्मा यांच्या घरी महिलांना 1100 रुपयांचे वाटप केले जात आहे. त्यांना जो बंगला खासदार असताना मिळाला होता, तिथे विविध झोपडपट्ट्यांमधील महिला मतदारांना बोलवण्यात आले. त्यांचे मतदान कार्ड तपासून अर्ज भरण्यात आले आणि लिफाप्यात 1100 रुपये दिल्याचा गंभीर आरोप आतिशी यांनी केला आहे.

आतिशी यांच्या या आरोपांना प्रवेश वर्मा यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या वडिलांनी राष्ट्रीय स्वाभिमान संस्थेची 25 वर्षांपूर्वी उभारणी केली होती. गुजरातमधील दोन भूकंपांनंतर आम्ही तिथे दोन गावे पसवली. ओडिशामध्ये वडिलांनी चार गावे वसवली होती. कारगिल युध्दानंतर सर्व शहिदांच्या कुटुंबांना दिल्ली बोलवून एक-एक लाख रुपये दिले होते. माझी संस्था खूप जूनी असून त्यामाध्यमातून आम्ही गरीब आणि गरजूंना मदत केली जाते.

आपने प्रवेश वर्मांवर कारवाईची मागणी केली आहे. पैसे वाटप केल्याच्या प्रकरणात त्यांना अटक करावी, अशी मागणी आतिशी यांनी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, प्रवेश वर्मा यांच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोकड मिळेल. भाजपचे सत्य समोर आले आहे. ईडी, सीबीआयने त्यांची चौकशी करावी, असे आतिशी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT