
New Delhi News : कझाकिस्तानमधील अकातूजवळ एका प्रवासी विमानाचा थरारक अपघात झाला आहे. अझरबैजान विमान कंपनीच्या या विमानात 62 प्रवासी आणि वैमानिकासह पाच जण कर्मचारी होती. या अपघातातून आश्यर्यकारकरीत्या 28 प्रवासी बचावल्याचे वृत्त आहे. याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
विमान कोसळण्यापूर्वी आपत्कालीन लॅँडिंगची परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच हे विमान समुद्रकिनारी कोसळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच पेट घेतला आणि त्याचे दोन तुकडे झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. ही दृश्य एवढी भयानक आहेत की, या अपघातात कुणीही वाचणार नाही, असाच अंदाज होता.
अपघाताचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये विमानाच्या तुटलेल्या एका भागातून काही प्रवासी जखमी अवस्थेत बाहेर पडताना दिसत आहेत. या प्रवाशांची संख्या जवळपास 28 असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विमानाने पाकू येथून रशियासाठी उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला आहे. पण अपघातामागचे कारण अदयाप समोर आलेले नाही. याबाबत कझाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे की, अपघातात जखमी झालेल्या 28 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघात झाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. तसेच कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी तातडीने अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच मृत आणि सुखरुप प्रवाशांचा अधिकृत आकडाही जाहीर करण्यात आलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.