Delhi Vidhansabha Election 2025  Sarkarnama
देश

Congress News : अस्तित्वाच्या लढाईसाठी काँग्रेसची धडफड; 'आप'च्या मुसक्या आवळणार का?

Delhi Vidhansabha Election 2025 : जर भविष्यात भाजपशी लढायचे असेल तर केवळ काँग्रेसमुळे अस्तित्वात असलेल्या पक्षाला पराभूत करणे वैचारिकदृष्ट्या आवश्यक आहे. कारण दिल्लीत आम आदमी पक्षाच्या येण्यानंतर काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.

Rashmi Mane

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीही नसले तरी, दिल्लीतील त्यांची कामगिरी येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. या निवडणुकीत काँग्रेस आम आदमी पक्षाची तुलना भाजपशी करत जोरदार हल्ला करत आहेत. लोकसभेत इंडिया आघाडीत एकत्र दिसणारे दोन्ही पक्ष यावेळेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांनी सीलमपूरच्या सभेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केल्यानंतर, काँग्रेस सतत आम आदमी पक्षाला लक्ष करत आहे. ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे कारण जर भविष्यात भाजपशी लढायचे असेल तर केवळ काँग्रेसमुळे अस्तित्वात असलेल्या पक्षाला पराभूत करणे वैचारिकदृष्ट्या आवश्यक आहे. कारण दिल्लीत आम आदमी पक्षाच्या येण्यानंतर काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.

काँग्रेसच्या मतांचा टक्का घसरला

२०१३ पूर्वी दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला ४०% पेक्षा जास्त मते मिळाली होती, परंतु २०१३ मध्ये ही संख्या २४.५% पर्यंत कमी झाली. त्यानंतर २०१५ मध्ये ते निम्म्याहून अधिक घसरून ९.६% वर आले. त्यानंतर २०२० मध्ये हा आकडा आणखी कमी झाला, त्यामुळे काँग्रेसचा मतांचा वाटा फक्त ४.२ टक्के राहिला. आम आदमी पक्षाच्या उदयाने ही घसरण सुरू झाली. ज्याला गेल्या २ विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. म्हणजेच २०१५ मध्ये ५४.३ टक्के आणि २०२० मध्ये ५३.५ टक्के.

काँग्रेसला 'या' समस्यांना तोंड द्यावे लागले

2013 च्या पराभवानंतर काँग्रेसला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यामध्ये कार्यकर्त्यांचा अभाव, संघटनाचा अभाव, गटबाजी यासारख्या समस्यांमुळे काँग्रेस या निवडणुकीत फक्त २०-२५ जागांवर लक्ष केंद्रित करत आहेत. काँग्रेस आपल्या पारंपारिक मतदारांना परत आकर्षित करण्यासाठी रणनिती आखत आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-आपला किती मुस्लिम मते मिळाली?

२०२० मध्ये काँग्रेस पक्षाला १३% मुस्लिम मते मिळाली, जी गेल्या निवडणुकीपेक्षा ७% कमी आहे, तर 'आप'ला ८३% मुस्लिम मते मिळाली, जी ६% जास्त आहे, त्यामुळे काँग्रेसचा असा विश्वास आहे की यावेळी ते त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करू शकते. त्यामुळे आम आदमी पक्ष मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागात विजय मिळवू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT