Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या हल्ल्यात थेट माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नाव, आरोपीच्या वडिलांनी केला मोठा दावा

Saif Ali Khan Attack Sheikh Hasina: अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला शरीफुल इस्लाम सज्जाद अटक केले आहे. त्याने बांगलादेशमधून भारतात घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.
Sheikh Hasina Saif Ali Khan
Sheikh Hasina Saif Ali Khan sarkarnama
Published on
Updated on

Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपीला शरीफुल इस्लाम सज्जाद याला पोलिसांनी अटक केले आहे. तो बांगलादेशातील असून त्याने भारतामध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. मात्र, त्याचे वडील मोहम्मद रूहुल अमीन यांनी आपल्या मुलाला फसवले जात असल्याचा दावा केला आहे.

अमीन म्हणाले, त्यांचा मुलगा शेख हासीना यांच्या विरोधात होता. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तो भारतात गेला होता. आपला परिवार हा शेख हसीना यांच्या विरोधी बीएनपी पार्टीचे समर्थन करतो. आम्ही त्यांच्याशी संबंधित आहेत त्यामुळे आपल्या मुलाला बसवले जात असल्याचे देखील अमीन यांनी सांगितले.

Sheikh Hasina Saif Ali Khan
Amit Shah Malegaon Tour : छगन भुजबळांच्या अमित शाह प्रेमाने उंचावल्या अनेकांच्या भुवया!

सैफ अली खान एक मोठा माणूस आहे. माझा मुलगा सात आठ महिन्यांपूर्वीच भारतात गेला आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळेत तो येवढ्या मोठ्या माणसावर हल्ला करू शकत नाही. माझा मुलगा निर्दोष आहे, असे म्हणत अमीन यांनी त्यांच्या मुलाची सुटका करण्याची मागणी केली आहे.

मोहम्मद रुहूल अमीन यांनी सांगितले की, त्यांना वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेल आणि पत्रकारांच्या माध्यमातून त्यांचा 30 वर्षीय मुलगा शरीफूल इस्लाम सज्जद याने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्याचे समजले. ज्याने सैफ वर हल्ला केला तो आरोपी माझ्या मुला सारखा दिसतो त्यामुळेच माझ्या मुलाला अटक करण्यात आले असल्याचे देखील अमीन यांनी सांगितले.

आपण तीन चार दिवसांनंतर बांगलादेशच्या विदेशी मंत्रालयात जाणार आहोत.तेथे आपण आपल्या मुलाला भारतामधून सोडवण्याची मागणी करणार असल्याचे अमीन यांनी सांगितले.

सैफ भेटला रिक्षाचालकाला

सैफ याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रिक्षाचालकाने आपण ज्याला मदत करतोय तो कोण आहे हे माहीत नव्हते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला कळाले की ज्याला तो रिक्षात घेऊन आला तो अभिनेता सैफ अली खान आहे. सैफ अली खानने देखील रिक्षाचालकाची भेट घेत त्याचे आभार मानले.

Sheikh Hasina Saif Ali Khan
Supriya Sule On Ajit Pawar : पवारसाहेब रिटायरमेंट घेणार होते; पण त्यामुळे अनेकांची अडचण झाली! सुप्रियाताईंचा अजितदादांना चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com