JP Nadda : आपने 10 वर्षात तोडले भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड; नड्डांनी आकडेच दिले

Delhi Election 2025 : वक्फ बोर्ड घोटाळ्यात मुस्लिमांचीही फसवणूक झाली आहे. दिल्लीतील जनता आता या भ्रष्टाचाराला सहन करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
JP Nadda
JP Naddasarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस बाकी असताना निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रचार सभेत बोलताना 'आप'वर जोरदार निशाणा साधला आहे. नड्डा म्हणाले, दिल्लीतील 10 वर्षांच्या राजवटीत पक्षाने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

आप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्या प्रकरणात आपचे अनेक मोठे नेते तुरुंगात गेले आहेत. तसेच, वक्फ बोर्ड घोटाळ्यात मुस्लिमांचीही फसवणूक झाली आहे. दिल्लीतील जनता आता या भ्रष्टाचाराला सहन करणार नाही असेही त्यांनी सांगितले.

केजरीवाल खोटं बोलण्यात माहीर आहेत.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) खोटारडे आहेत असा आरोप नड्डा यांनी यावेळी केला. ते म्हणाले, जर खोटे बोलण्याची राष्ट्रीय स्पर्धा असेल तर केजरीवाल प्रथम येतील. शिक्षण, आरोग्य आणि जल मंडळ यासारख्या विभागांमध्ये मोठे घोटाळे झाल्याचा देखील आरोप नड्डा यांनी केला. या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याऐवजी आप सरकारने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे.

JP Nadda
Success Story : नामांकित कंपनीची 30 लाखांची नोकरी धुडकावली; मेहनतीच्या जोरावर बनले IAS

नड्डा यांनी आरोप केला की, आप (AAP) सरकारच्या काळात दिल्लीत ४,५०० कोटी रुपयांचा बस घोटाळा देखील झाला, तर ५७१ कोटी रुपयांचा सीसीटीव्ही घोटाळाही उघडकीस आला. तसेच यमुना नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन देण्यात आले होते पण त्याऐवजी ७,००० ते ८,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. नड्डा यांनी दिल्लीतील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की वर्गखोल्यांच्या बांधकामात १,३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

JP Nadda
Dinvishesh 24 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा संदेश

सभेच बोलताना नड्डा म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुका दिल्लीच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मतदारांनी हे लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आप नेते भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा दावा करत असतानाच ते स्वतः इतके भ्रष्ट झाले की त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना तुरुंगात जावे लागले. नड्डा पुढे म्हणाले, "५ फेब्रुवारी हा तुमच्यासाठी बदल घडविण्यासाठी एक संधी आहे." त्यामुळे मतदारांनी वितार करून मतदान केले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com