MHA Transfers Case to NIA for Terror Link Probe : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच भूतान येथून स्फोट घडविणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सातत्याने तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. कालच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या स्फोटाचा तपास सोपविल्यानंतर आज पुन्हा या तपासात मोठी घडामोड घडली आहे.
दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे सोपविल्यानंतर आता 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन आयजी, दोन डीआयजी, तीन एसपी आणि उर्वरीत डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या टीमने स्फोटाचा तपासही सुरू केल्याचे समजते. या टीमचे नेतृत्व एका मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे हे ‘स्पेशल 10’ पथकाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. दिल्ली स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर थेट दिल्लीत हा स्फोट झाल्याने मोदी सरकारसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे दिल्ली स्फोट प्रकरण हायहोल्टेज बनले आहे.
IPS विजय साखरे यांच्या टीमसमोर या स्फोटाच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान असणार आहे. साखरे हे मुळेच नागपूरचे आहेत. १९९६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक करत त्यांनी भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. ते केरळ केडरचे अधिकारी आहेत. केरळमध्ये अनेक महत्वाच्या वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
आतापर्यंत दिल्ली स्फोटप्रकरणी प्राथमिक तपासात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी संशयित तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. तर कार स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे हा स्फोट कुणी घडवून आणला, यामागे कोणती दहशतवादी संघटना होती का, याचं कोडं उलगडलेलं नाही. विजय साखरे यांच्या टीमसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.