MCA Election News : प्रतिष्ठा पणाला; जितेंद्र आव्हाड अन् मिलिंद नार्वेकरांसाठी फडणवीसांच्या विश्वासू नेत्यानं टाकला 'डाव'...

Sharad Pawar and Ashish Shelar Panels Compete in MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांचे पॅनेल मैदानात आहे. आज दुपारी तीन ते सहा या वेळेत मतदान होणार आहे.
Jitendra Awhad, Ashish Shelar, Milind Narvekar
Jitendra Awhad, Ashish Shelar, Milind NarvekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai politics : राजकीय आखाड्यातील कट्टर विरोधकांना एका निवडणुकीने एकत्र आणले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विजयासाठी नेत्यांकडून उघडपणे प्रचारही केला जात असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत नाही. थोडं थांबा, ही निवडणूक नगरपंचायत किंवा नगरपरिषदेची नाही तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा पॅनेल मैदानात उतरला आहे. दोन्ही नेते असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे या संघटनेच्या कामकाजावर त्यांचा मोठा प्रभाव असतो. यंदाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकत्रित येत आपला पॅनेल उभा केला आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक त्यातूनच बिनविरोध झाली असून अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदार यांसह अन्य पदांसाठी बुधवारी दुपारी मतदान होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी पवारांच्या पक्षातील नेते आमदार जितेंद्र आव्हाड तर सदस्य पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर मैदानात आहेत.

Jitendra Awhad, Ashish Shelar, Milind Narvekar
Bihar Election Result : बिहारचा निकाल मोठा धक्का देणार? महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा, एक्झिट पोलही ठरतील फेल...

आव्हाड आणि नार्वेकरांच्या प्रचारासाठी थेट आशिष शेलार मैदानात उतरले आहेत. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत अजिंक्य नाईक, आव्हाड आणि नार्वेकरही दिसत आहे. पवार-शेलार पॅनेलच्या या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान ते व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांना करताना दिसत आहेत.

Jitendra Awhad, Ashish Shelar, Milind Narvekar
Delhi blast update : भारतही मोठा धमाका करणार? PM मोदींच्या विधानाने खळबळ, शहांची दिल्लीत हायहोल्टेज बैठक सुरू

त्याप्रमाणे शेलार यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच शरद पवार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत, उद्या 3 ते 6 वाजेपर्यंत मतदान करून 'पवार-शेलार' पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा, असे आव्हान शेलार यांनी केले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com