Rahul Gandhi Delhi protest sarkarnama
देश

Rahul Gandhi : 'आता तर अजिबातच नाही', असा निर्वाणीचा इशारा देत राहुल गांधींनी केल्या ५ प्रमुख मागण्या

Rahul Gandhi Five Demands : नीट पेपरफुटीवरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप आले असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गाधी आणि विरोधी खासदारांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Aslam Shanedivan

Congress Delhi Protest News : दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर हे अधिकच तीव्र झाले आहे. मंगळवारी या आंदोलनाला काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी आणि विरोधी खासदारांनीदेखील पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी येथे 'हाय व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला असून राहुल गांधी यांनी या लढ्यात उडी घेताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे पोहोचले. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी पाच मागण्या केल्याचे समोर आले आहे.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या घटनेवर प्रचंड आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबाबत आपण काहीही उत्तर दिले नाही तरी, कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता यातून सहीसलामत सुटणार असल्याचे त्यांना वाटत आहे. पण ते तसे करू शकत नाहीत. यावेळी तर अजिबातच नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच शिक्षणमंत्र्यांसोबतच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे पोहोचले. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ५ मागण्या ठेवल्या. या मागण्या ऐकल्यानंतर जितेंद्र सिंह हे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

नेमक्या कोणत्या मागण्या?

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.

आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करा.

अधिवेशनामध्ये नीट पेपरफुटीवर चर्चा करा.

गृहमंत्र्यांनी याविषयी दोन्ही सदनांत निवेदन द्यावे.

आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर निष्पक्ष चौकशी करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT