

Ram Mandir News : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. "लाखो भाविकांच्या श्रद्धेचा हा विश्वासघात असून, या प्रकरणावर तुमचे मौन आता स्वीकारार्ह नाही," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, "लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने आपल्या कष्टाची कमाई राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिली. मात्र, ट्रस्टमध्ये झालेल्या हजारो कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे आज प्रत्येक भाविकाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे."
राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, "लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने आपल्या कष्टाची कमाई राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिली. मात्र, ट्रस्टमध्ये झालेल्या हजारो कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे आज प्रत्येक भाविकाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे."
पुढे त्यांनी म्हटले आहे की, "भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तुम्ही स्वतः संसदेत या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती. या ट्रस्टच्या सदस्यांची नियुक्ती पूर्णपणे तुमच्या सरकारनेच केली आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांचे आहेत हे जगजाहीर आहे. एवढेच नव्हे तर ज्या माजी सरचिटणीसांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत, तेही तुमच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत." अशा गंभीर आरोपांनंतरही पंतप्रधानांनी बाळगलेले मौन संशयास्पद आहे.
स्वतंत्र चौकशीचे आदेश द्या: ट्रस्टचे आर्थिक व्यवहार, रोख रक्कम, सोने, चांदी आणि मिळालेल्या सर्व देणग्यांच्या व्यवस्थापनाची तातडीने स्वतंत्र आणि सर्वंकष चौकशी करण्यात यावी.
हिशोब सार्वजनिक करा: चौकशीचा अहवाल आणि ट्रस्टची सर्व आर्थिक खाती सार्वजनिक करावीत, जेणेकरून देणगी देणाऱ्या प्रत्येक भाविकाला पैशांचा हिशोब समजेल.
दोषींवर कठोर कारवाई करा: चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याचे पद किंवा राजकीय प्रभाव कितीही मोठा असला तरी त्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
"तुमच्या सरकारची आणि राम मंदिर ट्रस्टची विश्वासार्हता आता तुम्ही या प्रकरणात किती पारदर्शकतेने आणि तत्परतेने कारवाई करता यावरच अवलंबून आहे. संपूर्ण देश तुमच्या भूमिकेकडे डोळे लावून बसला आहे," असा इशारा देत राहुल गांधी यांनी पत्राचा शेवट केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.