Arvind Kejriwal, Bhagwant Mann Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांसह भगवंत मान गुजरातच्या तुरूंगात... नेमकं काय घडलं?

Gujarat : गुजरात आपचे कार्यकारी अध्यक्ष व त्यांची पत्नी तुरूंगात...

Rajanand More

Gujarat News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीकडून आतापर्यंत चार समन्स पाठवण्यात आले आहेत. पण त्यांनी एकदाही चौकशीला हजेरी लावलेली नाही. त्यानंतर गुजरातच्या दौऱ्यावर येत केजरीवालांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तुरुंगातील नेत्याला पहिली उमेदवारी जाहिर करत सोमवारी त्यांना भेटायलाही गेले. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गुजरात (Gujarat) आपचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार चैतर वसावा (Chaitar Vasava) आणि त्यांच्या पत्नी शकुंतला वसावा यांना काही दिवसांपुर्वी अटक करण्यात आली आहे. सध्या ते राजपिपला येथील उप कारागृहात आहेत. केजरीवाल ( Arvind Kejriwal) व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant mann) यांनी सोमवारी या तुरूंगात जाऊन त्यांची भेट घेतली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वन अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक कऱण्यात आले आहे.

केजरीवाल यांनी रविवारी वसावा यांना लोकसभेची उमेदवारीही घोषित करत लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) रणशिंग फुंकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी वसावा यांची थेट तुरूंगात जाऊन भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जवळपास अर्धा तास ते त्यांची भेट सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम आमदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. आम्ही वसावा व त्यांच्या पत्नीलाही भेटलो. ते दोघेही सुरक्षित असून आपला लढा सुरूच ठेवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीत लोकांकडून भाजपला हद्दपार केले जाईल. भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कुणालाही तुरुंगात टाकत आहेत. लोकांसाठी लढले, ही वसावा यांची चूक होती. आम्ही त्यांना भरूच लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहे. लवकर ते तुरुंगातून बाहेर येतील, अशी आशा आहे. तसे झाले नाही तरी त्यांच्यावतीने पक्ष पूर्ण ताकदीने ही जागा लढवेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT