Assembly Election : भाजपला दे धक्का; दहा दिवसांपूर्वीच शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा दारुण पराभव

BJP Vs Congress : काँग्रेसच्या उमेदवाराने चारली धूळ...
Congress, Bjp
Congress, BjpSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चारत मोठा विजय मिळवलेल्या भाजपला राज्यात पहिला धक्का बसला आहे. दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्याचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना बारा हजार मतांनी पराभूत केले. मुख्यमंत्री भजनलाल आणि भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) राजस्थानमध्ये 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झाले होते. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर मतदारसंघात प्रचारादरम्यान काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसघातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपला 115, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या.

Congress, Bjp
Bilkis Bano Case : महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवत सुप्रीम कोर्टाने गुजरातला झोडपले

करणपूर मतदारसंघात निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये भाजपकडून (BJP) सुरेंद्र पालसिंह टीटी (Surndra Pal singh TT) यांना तिकीट देण्यात आले होते. पण निकालाआधीच त्यांना भजनलाल मंत्रिमंडळात घेण्यात आले. निवडणुकीत काँग्रेसने (Congress) रुपिंदरसिंह कुन्नर यांना उतरवले होते. सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कुन्नर यांनी टीटी यांना 12 हजार मतांनी पराभूत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकालाआधीच मंत्रिपदाची शपथ दिल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. पण त्यानंतरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला असून काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने शपथ देण्यावरून टीकाही केली होती. निकालाआधीच उमेदवाराला मंत्रिपदाची शपथ देणे बेकायदा असून आचारसंहितेचा भंग असल्याची टीका काँग्रेसने केली होती.

Congress, Bjp
Bangladesh Election : मोदींप्रमाणे शेख हसिना यांनीही घडवला इतिहास; ‘डमी’ उमेदवारांचाही बोलबाला

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या विजयानंतर भाजपवर टीका केली आहे. तसेच कुन्नर यांचे अभिनंदनही केले. करणपूरच्या जनतेने भाजपच्या अभिमानाला हरवले आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराला मंत्री बनवून आचारसंहिता आणि नैतिकता पायदळी तुडवणाऱ्या भाजपला जनतेनेच धडा शिकवला असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.

R...

Congress, Bjp
Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला सर्वात मोठा धक्का; दोषींची सुटका रद्द..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com