swati maliwal bibhav kumar sarkarnama
देश

Swati Maliwal Case : केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना न्यायालयाचा दणका

MP swati maliwal bibhav Kumar : खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी सुरूवातीला चौकशीसाठी ताब्यात घेत आणि त्यानंतर अटक केली.

Pradeep Pendhare

Bibhav Kumar News : आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक विभव कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका तीस हजारी न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर दोन्ही बाजूने सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली. (Delhi Swati Maliwal Case Update)

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांना 13 मे रोजी विभव कुमार यांनी मारहाण केली. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांच्या फिर्यादीवरून विभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांना ई-मेल करत विभव कुमार यांनी तपासात सहकार्य करणार असल्याचे कळवले होते. माध्यमांद्वारे गुन्हा दाखल झाल्याचे कळाले. पोलिसांकडून नोटीस मिळाली नाही. माझ्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी लक्ष द्यावे, असेही विभव कुमार यांनी म्हटले होते. याच दरम्यान, विभव कुमार यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली. विभव कुमार यांच्यावतीने वकील करण शर्मा यांनी तीस हजारी न्यायालयासमोर बाजू मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपच्या (AAP) खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणप्रकरणी विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी सुरूवातीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी ते दिल्ली येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होते. विभव कुमार यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी तीस हजारी न्यायालयासमोर याचिका दाखल केली. न्यायालयात दोन्ही दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने विभव कुमार यांची याचिका फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

विभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाली होती. त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी भेट देखील पाहणी करत पंचनामा केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी या प्रकरणात सुरूवातीला मौन बाळगले होते. मात्र या प्रकरणावरून भाजप आपविरोधात चांगलीच आक्रमक झाली. आपच्या या भूमिकेवर भाजपकडून निषेध करण्यास सुरूवात झाली होती. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची माहिती संजय सिंह यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT