Delhi Political News : काँग्रेसचे ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी (ता. 17) हल्ला झाला. ते मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करत होते. त्यावेळी त्यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे आरोपी पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने कन्हैया यांच्याजवळ गेले होते.
कन्हैया कुमार हे आपल्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काही नेते होते. यावेळी कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने काही लोक त्यांच्याजवळ आले. जवळ येताच त्यांनी कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपींनी आपच्या नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत, कन्हैया कुमारांना मारहाण करणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडील शाल हिसकावून नेली. तसेच त्यांच्या पतीला बाजूला नेऊन धमकावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी प्रचार करणाऱ्या लोकांवर काळी शाई फेकली आहे. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत इतर तीन-चार लोकही जखमी झाले आहेत. यात महिलांचा समावेश असल्याचाही शर्मांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे कन्हैया कुमार हे भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.