Delhi Election 2025 : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा आज (सोमवारी) प्रसिद्ध केला. आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यात दिल्लीतील लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये आणि संजीवनी योजनेअंतर्गत वृद्धांसाठी मोफत जमीन देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे.
आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, अरविंद केजरीवाल यांनी चुकीचे वीज बिल माफ करण्याची हमीही दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि दलित मुलांसाठी परदेशात शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलेल असे आश्वसन यावेळी दिले.
१- रोजगार हमी
२- महिला सन्मान योजना- प्रत्येक महिलेच्या खात्यात २१०० रुपये दिले जातील.
३- संजीवनी योजना- ६० वर्षांवरील लोकांसाठी मोफत उपचार.
४- चुकीचे पाणी बिल माफ केले जाईल
५- २४ तास पाणीपुरवठा
६- युरोपसारखे रस्ते
७- आपण यमुना नदीचे पाणी स्वच्छ करू.
८- डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती योजना
९- विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास, दिल्ली मेट्रोमध्ये भाड्यात सूट
१०- पुजारी आणि ग्रंथीला दरमहा १८,००० रुपये मिळतात.
११- भाडेकरूंना मोफत वीज आणि पाणी
१२- गटार दुरुस्तीचे काम
१३- रेशन कार्ड
१४- ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये, मुलांसाठी मोफत कोचिंगसह जीवन आणि आरोग्य विमा मिळेल.
१५- खाजगी सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यासाठी आरडब्ल्यूएला निधी.
जाहीरनामा प्रसिद्ध करतांना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला, निवडणुकीदरम्यान भाजप, काँग्रेस किंवा इतर पक्ष ज्या काही घोषणा करतात त्या केवळ निवडणुकीपूरत्या असतात.
जेव्हा आम्ही गॅरंटी हा शब्द वापरायला सुरुवात केली तेव्हा त्यांनीही गॅरंटी हा शब्द वापरायला सुरुवात केली. आता ही केजरीवालांकडून खात्रीशीर हमी आहे. त्यांच्यासारखे कच्चे आश्वासन आम्ही देणार नाही असा घणाघात केजरीवालांनी केला.
दरम्यान, आज आम्ही 15 मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या पुढील 5 वर्षांत पूर्ण केल्या जातील. यामध्ये पहिली हमी म्हणजे रोजगार. दुसरी हमी म्हणजे प्रत्येक महिलेला दरमहा 2100 रुपये महिला सन्मान योजना आणि तिसरी हमी म्हणजे उपचारांसाठी संजीवनी योजना अशा घोषणा यावेळी केल्या.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अरविंद केजरीवाल म्हटले की, २०२० मध्ये दिलेली तीन आश्वासने आपण पूर्ण करू शकलो नाही. आम्ही म्हटले होते की आम्ही २४ तास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू, यमुना स्वच्छ करू आणि दिल्लीचे रस्ते युरोपियन दर्जाचे बनवू पण सरकार फेब्रुवारी २०२० मध्ये स्थापन झाले आणि कोरोना मार्चमध्ये आला.
कोरोना अडीच वर्षे टिकला आणि त्यानंतर त्यांनी (केंद्र सरकारने) आमच्यासोबत जेल-जेल-जेलचा बनावट खेळ खेळला. केजरीवाल म्हणाले की, कधी सत्येंद्र जैन तुरुंगात असतात, कधी मनीष सिसोदिया तर कधी संजय सिंह यामुळे आम्ही काही आश्वासने पूर्ण करू शकलो नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.