One Nation One Time: देशात एकच वेळ!मोदी सरकारनं मागवल्या सूचना; घड्याळाची वेळ IST नुसार

India Standard Time consumer ministry Proposal:सार्वजनिक प्रशासन, कायदेशीर करार, व्यावसायिक, परिवहन, आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रात आयएसटी (IST)हे प्रमाण वेळेचा संदर्भ म्हणून बंधनकारक असेल.
One Nation One Time
One Nation One TimeSarkarnama
Published on
Updated on

एक देश-एक निवडणूक यांची अमंलबजावणी करण्याचा केंद्र सरकारचा विचारात असताना देशात सगळीकडे एकच वेळ असावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय प्रमाणवेळेचा वापर करणे आता बंधनकारक राहणार आहे.

बँकिंग, टेलिकम्युनिकेशन, 5जी, संरक्षण, एआय आदी नव्या टेक्नॉलॉजीसह महत्त्वाच्या राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेळेचं पालन निश्चित करण्याचा एक प्रयत्न म्हणून ग्राहक मंत्रालयाने हा प्रस्ताव मांडला आहे.

One Nation One Time
Maharashtra Politics: पालकमंत्रिपदी कुणाचा राज्याभिषेक? रायगड, नाशिकबाबत महायुतीत आज खलबत

ग्राहक मंत्रायलाकडून यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत यावर प्रतिक्रिया मागितल्या आहेत. ग्राहक मंत्रायलाने वेळेबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, सार्वजनिक प्रशासन, कायदेशीर करार, व्यावसायिक, परिवहन, आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रात आयएसटी (IST)हे प्रमाण वेळेचा संदर्भ म्हणून बंधनकारक असेल.

One Nation One Time
Narhari Zirwal: गरीब जिल्हा म्हणजे काय रे भाऊ? हा तर हिंगोलीकरांचा अपमानच!

आयएसटीशिवाय वेळेच्या इतर संदर्भांच्या वापराला बंदी, सरकारी कार्यालय, सार्वजनिक संस्थांमध्ये आयएसटीचा वापर बंधनकारक करणं यांचा अधिकृत आणि व्यावसायिक उद्देशांमध्ये समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com