Bihar Politics: होळीनंतर बिहार 'पेटणार'; मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची राजकारणात होणार एन्ट्री?

Nishant Kumar Political Entry: घराणेशाहीला विरोध करणारे नितीश कुमार आपल्या सुपुत्राला राजकारणात आणतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Nishant Kumar Political Entry
Nishant Kumar Political EntrySarkarnama
Published on
Updated on

Bihar News 27 Jan 2025 : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा जुनी चर्चा नव्यानं सुरु झाली आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार हे लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती आहे. यावरुन बिहारच्या राजकीत वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसापूर्वी नितीश कुमार हे त्यांच्या गावी गेले होते. त्या ठिकाणी एका कार्यक्रमानंतर माध्यमासमोर निशांत कुमार राजकीय भाष्य केले होते.

नवीन वर्षांतील निवडणुकीत आपले वडील (नितीश कुमार) आणि त्यांच्या पक्षाला जनतेने मतदान करावे, बिहारचा विकास करण्यासाठी सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे निशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार निशांत हे होळीनंतर राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती आहे.

Nishant Kumar Political Entry
Sanjay Raut : संजय राऊतांसमोरच रंगले मानपान नाट्य !...म्हणून माजी आमदार मोकाटे रागाने बैठकीतून पडले बाहेर

नितीश कुमार यांच्या निकटवर्तीय नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, निशांत कुमार यांनी राजकारणात येण्याची तयारी पूर्ण केली आहे. ते आपले वडील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या होकाराची वाट पाहत आहेत. निशांत कुमार यांना राजकारणात सक्रिय करा, अशी विनंती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Nishant Kumar Political Entry
Delhi Vidhan Sabha Election: गुजरात पोलिसांची 'दिल्ली'वर 'नजर'; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

घराणेशाहीला विरोध करणारे नितीश कुमार आपल्या सुपुत्राला राजकारणात आणतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीच्या घराणेशाहीवर तुटून पडणारे नितीश कुमार आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संयुक्त जनता दलात निशांत कुमार यांचा प्रवेश होणार असल्याती चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांनी निशांत कुमार यांच्या प्रवेशासाठी आग्रह धरला आहे. पण जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची ही मागणी फेटाळली आहे.

2015 मध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ सोहळ्यास निशांत कुमार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कुठल्याही राजकीय व्यासपीठावर हजेरी लावले नाही. सध्या तरी निशांत कुमार यांच्या राजकारणात येण्याची चर्चा असली तरी पक्षाकडून त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 2013 मध्ये त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांना राजकारणात सक्रिय केले होते. त्याच दरम्यान रामविलास पासवान यांनी आपले सुपुत्र चिराग पासवान यांची राजकारणात एन्ट्री केली होती. 2014 च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये सहभागी करुन घेण्याबाबतची महत्वाची भूमिका घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com