Rajiv Kumar  Sarkarnama
देश

Delhi Election 2025 : दिल्लीच्या निवडणुकीतही महाराष्ट्र पॅटर्न; आयोगाने लढवली 'ही' शक्कल

Delhi assembly elections Rajiv Kumar : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Rashmi Mane

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दिल्लीच्या निवडणुकीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने महाराष्ट्रात बुधवारी मतदान घेतले होते. दिल्लीतही बुधवारी मतदान होणार आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. मतदानाचा टक्का वाढत नसल्याने आयोगाकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. हा टक्का वाढवण्यासाठी आयोगाने महाराष्ट्रात बुधवारी मतदान ठेवले होते. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. त्यामुळे तोच पॅटर्न आता दिल्लीतही राबवला जाणार आहे.

सुट्टीच्या दिवशी किंवा सुट्ट्यांना जोडून मतदानाचा दिवस असल्याने अनेक मतदार मतदान न करता बाहेर फिरायला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटते. टक्केवारी कमी राहण्याचे हे एकमेव कारण नसले तरी महत्वाचे कारण आहे. त्यामुळे आयोगाने दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न राबवत बुधवारी मतदान ठेवले आहे.

एकाच टप्प्यात मतदान होणार असून निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे. तर 18 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20 जानेवारी असणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे.

मतदान केंद्रावर काय सुविधा असणार आहेत?

ही निवडणूक नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे होणार आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदानाची सुविधा असणार आहे. मतदान केंद्रांवर स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि रॅम्प असतील. वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी रांगेत बेंच असतील. यावेळी 13,000 हून अधिक मतदान केंद्रे आणि 100 टक्के वेबकास्टिंग असणार आहे. दिल्लीत एकूण 1.55 कोटींहून अधिकृत मतदारांची यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी न केलेला कोणताही पात्र नागरिक नावनोंदणीच्या शेवटच्या तारखेच्या 10 दिवस आधी नोंदणी करू शकतो.

फॉर्म 17 शिवाय नाव काढता येणार नाही: निवडणूक आयोग

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, संध्याकाळी मतदान संपल्यानंतर ईव्हीएममध्ये किती मतदान झाले याचा तपशील बुथवर उपस्थित असलेल्या पक्षांच्या पोलिंग एजंटांसमोर एका फॉर्ममध्ये भरला जातो. या फॉर्मला 17C म्हणतात.

यामध्ये बूथमध्ये उपस्थित असलेल्या ईव्हीएमची संख्या आणि त्यात किती मते पडली याची नोंद केली जाते. त्यानंतर ईव्हीएम सील करून स्टॉर्ग रूममध्ये पाठवले जाते. पक्षांचे पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत बूथवर उपस्थित असल्याने त्यांच्याकडेही ईव्हीएमची सर्व माहिती असते. अशा प्रकारे, फॉर्म 17C मध्ये ईव्हीएम आणि मतदानाचा तपशील भरल्यानंतर, त्याची एक प्रत सर्व मतदान प्रतिनिधींना दिली जाते..

ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही

राजीव कुमार यांनी यावेळी ईव्हीएमवर भाष्य केले. ईव्हीएमवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT