Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत निवडणुकीचा बिगुल वाजला; 5 फेब्रुवारीला मतदान, आयोगाकडून घोषणा

Election Commissioner Rajive Kumar Election Schedule Polling Dates in Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

राजीव कुमार यांनी आज दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत सर्व 70 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात दिल्लीत कुणाची सत्ता येणार, आप पुन्हा सत्ता काबीज करणार का, याची उत्तरे मिळणार आहेत.

Election Commission of India
Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन; सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब

दरम्यान, दिल्लीत प्रामुख्याने सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. आपने सर्वच जागांवरील उमेदवारांची घोषणा करून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसनेही जवळपास 50 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून काही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

आयोगाकडून ताकीद

निवडणूक आयोगाने प्रचारादरम्यान स्टार प्रचारकांनी मर्यादेत राहून बोलावे, असे आवाहन केले आहे. महिलांविषयी बोलताना काळजी घ्यावी. निवडणुकीत प्रचारादरम्यान लहान मुलांचा वापर टाळावा, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले आहे.

Election Commission of India
Bharatpol : फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘भारतपोल’; अमित शहांचा मास्टरस्ट्रोक

ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही

राजीव कुमार यांनी यावेळी ईव्हीएमवर भाष्य केले. ईव्हीएमवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणुक आयोग पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com