New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवालांना विशेष न्यायालयाने दिलेल्या जामीनाला दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी स्थगिती दिली.
मागील आठवड्यात केजरीवालांना दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण ईडीने तातडीने दिल्ली हायकोर्टात धाव घेत त्याला विरोध केला. तसेच जामीनाला स्थगिती देण्याची विनंती हायकोर्टात केली होती. कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. कोर्टाने मंगळवारी निकाल दिला. त्यानुसार आता केजरीवालांना जेलमध्येच राहावे लागणार आहे.
हायकोर्टाने ईडीची याचिका मंजूर केल्याने केजरीवालांना आता सुप्रीम कोर्टाकडे दाद मागावी लागणार आहे. याविषयी बोलताना केजरीवालांचे वकील ऋषिकेश कुमार म्हणाले, हायकोर्टाने यापुर्वीच जामीनावर दिलेल्या अंतरिम स्थगितीविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आजच्या निकालाची प्रत आम्ही सुप्रीम कोर्टात देऊ. त्यावर सुनावणी घेण्याची विनंती कोर्टात केली जाईल.
एकदा जामीन दिल्यानंतर त्यावर स्थगिती देता येत नाही. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात बाजू मांडली जाईल, असेही वकिलांनी स्पष्ट केले. ईडीने कोर्टात सादर केलेल्या माहितीचे स्थानिक कोर्टाने योग्यप्रकारे आकलन केले नाही, असे हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांना ईडीने मार्च महिन्यात अटक केली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत 21 दिवसांसाठी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता. ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा तिहार जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर त्यांनी नियमित जामीनासाठी स्थानिक कोर्टात याचिका केली होती. त्यानुसार कोर्टाने मागील आठवड्यात त्यांनी जामीन दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.