Lok Sabha Speaker Election : ममतांचा विरोधकांना पुन्हा झटका; लोकसभेत बुधवारी होणार ‘खेला’?

Mamata Banerjee INDIA Alliance Lok Sabha Speaker Election 2024 BJP Congress : लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून मंगळवारी काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

New Delhi : इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीतही आघाडीला झटका दिला आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएने खासदार ओम बिर्ला तर विरोधकांनी खासदार के. सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी सकाळी अर्ज दाखल करण्यापुर्वी अनेक घडामोडी घडल्या. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यशही आले होते. पण अचानक मोठा ट्विस्ट आला आणि काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला.

Mamata Banerjee
Lok Sabha Speaker : विरोधकांची 'ती' अट ठरली लोकसभा अध्यक्षपदाच्या ऐतिहासिक निवडणुकीस कारणीभूत!

काँग्रेसच्या निर्णयाला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांची सहमती नसल्याचे आता समोर आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या नेत्यांनी के. सुरेश यांच्या समर्थन पत्रावर सही केली नसल्याचे समजते. त्यामुळे ममतांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेला पवित्रा लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कायम ठेवल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीत ममता इंडिया आघाडीतून असूनही त्यांनी बंगालमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे खासदार के. सुरेश यांना पाठिंबा देणार की तटस्थ राहणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Mamata Banerjee
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेसने उमेदवार उतरवला...

मतदान बुधवारी सकाळी होणार आहे. लोकसभेत विरोधकांना एकी दाखवण्याची ही पहिली संधी मिळाली आहे. असे असताना ममतांच्या या भूमिकेमुळे वेगळा संदेश जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, लोकसभा उपाध्यक्ष पदाचा आधी निर्णय घ्यावा, नंतरच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देऊ, अशी अट विरोधकांनी एनडीएला घातली होती. मात्र, ही अट एनडीएने मान्य न केल्याने विरोधकांनी उमेदवार उतरवला आहे. त्यावरून आता पुन्हा एनडीए विरुध् इंडिया आघाडीतील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com