CJP Abhijeet Dipke news Sarkarnama
देश

Cockroach Janata Party news : कॉक्रोच जनता पार्टीला कोर्टाचा झटका; अभिजीत दीपके यांना सरकारसमोर यावे लागणार, 'फेस टू फेस' होणार चिरफाड

Abhijeet Dipke latest news, Delhi High Court CJP case : हायकोर्टाच्या आदेशानुसार आता अभिजीत दीपके यांना या समितीसमोर हजर व्हावे लागणार आहे. ते सध्या अमेरिकेत आहे.

Rajanand More

CJP X account issue : सोशल मीडियात धुमाकूळ घालत सत्ताधारी भाजपला शिंगावर घेणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची पार्टीचे एक्स अकाऊंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी तातडीने मान्य करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पार्टीचे अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.

दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती पुरूषैन्द्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर दीपके यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. आक्षेपार्ह आशय असल्यामुळे सीजेपीचे एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याविरोधात दीपके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने सीजेपीच्या अकाऊंवर काही गोष्टी आक्षेपार्ह असल्याचे निरीक्षण नोंदविले.

दीपके यांच्या याचिकेवर सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. सरकार आणि एक्सचे बाजू ऐकून घेतल्यानंतर आदेश जारी करता येईल, असे कोर्टाने सांगत कोर्टाने दीपके यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. मात्र, कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करत यावर चार आठवड्यांत म्हणणे सादर करण्यास सांगितले. कोर्टाने आता ६ जुलैची पुढील तारीख दिली आहे.

कोर्टाने दीपके यांना दिलासा देण्यास नकार दिला असला तरी केंद्र सरकारच्या पुनरावलोकन समितीकडे जाण्यास सांगितले आहे. ही समिती सोशल मीडियातील ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंट्सबाबत समोरासमोर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेते. आयटी कायद्यानुसार या समितीचे कामकाज चालते. ही कमिटी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्‍यांच्या अंतर्गत येते. कोर्टाने दीपके यांची बाजू ऐकून घेण्याचे आदेश समितीला दिले आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार आता दीपके यांना या समितीसमोर हजर व्हावे लागणार आहे. ते सध्या अमेरिकेत आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समितीला सामोरे जाण्याची परवानगी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टी अस्तित्वात आल्यानंतर दीपके या समितीच्या माध्यमातून पहिल्यांदाच केंद्र सरकारला सामोरे जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT