

Karnataka Congress politics : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिध्दरामय्या यांनी थेट दिल्ली गाठली. शुक्रवारी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यादरम्यान, कर्नाटकातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोइली यांनी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
राज्यात मागील सहा महिन्यांपासून सिध्दरामय्या पदभार सोडणार असल्याची चर्चा होती. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांकडून याबाबत उघडपणे विधाने केली जात होती. २०२३ मध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर सिध्दरामय्या आणि शिवकुमार यांच्यामध्ये अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरल्याचा दावा शिवकुमार समर्थक आमदारांकडून केला जात होता. इतर आमदार हा दावा फेटाळून लावत होते.
अखेर सिध्दरामय्या यांनी राजीनामा देताच वीरप्पा मोइली यांनी त्यावर भाष्य करत शिवकुमार यांची बाजू घेतली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे राजकीय परिवर्तन आहे. मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांचा कार्यकाळ खूप चांगला राहिला. आठ वर्षे त्यांनी आमचे नेते म्हणून काम केले. त्यांनी दुसऱ्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला तेव्हाच अडीच वर्षांनंतर नेतृत्वात बदल होईल, असे ठरले होते.
मुख्यमंत्रिपदावर अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही काही महिने सिध्दरामय्या या पदावर राहिले. हा बदल होणार असल्याचे त्यांना माहिती होते. त्यानुसार बदल होणार आहे, असे मोइली यांनी सांगितले. पक्षासह त्यांनी राज्य सरकारमध्येही चांगल्याप्रकारे काम केले. सरकारमधील बदल अत्यंत व्यवस्थित होत आहे. याचा अर्थ पुढील दोन वर्षे मजबूत सरकार असेल. काँग्रेसचा परंपरा कायम राहील, असे विश्वासही मोइली यांनी व्यक्त केला.
सरकारमधील नेतृत्व बदलामुळे लगेच मोठा परिणाम होईल, याची शक्यताही मोइली यांनी फेटाळून लावली. दरम्यान, डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, इतर आमदारांनी मात्र मंत्रिपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यपद सध्या शिवकुमार यांच्याकडे आहे. आता या पदासाठीही लॉबिंग सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.