Kailash Gahlot, VK Saxena Sarkarnama
देश

Independence Day : ना आतिशी, ना सिसोदिया ‘या’ नेत्याला ध्वजारोहणाचा मान; राज्यपालांकडून नाव फायनल...

Kailash Gahlot VK Saxena Delhi Government : मागील दोन दिवसांपासून ध्वजारोहण कोण करणार, यावरून दिल्लीत चर्चांना उधाण आले होते.

Rajanand More

New Delhi : दिल्ली सरकारच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार, यावरील चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आम आदमी पक्षाचे नेते व केजरीवाल सरकारमधील गृहमंत्री कैलाश गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमध्ये असल्याने यंदा ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावरून राजकारणही चांगलेच तापले होते.

नायब राज्यपालांनी कैलाश गेहलोत यांचे नाव पुढे आप आणि त्यांच्यातील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. राजभवनाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले होते. त्यांनी नायब राज्यपालांना एका मंत्र्यांची निवड करण्यात अधिकार दिले होते. छत्रसाल स्टेडियममधील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन गृह मंत्रालयाकडून केले जाते. त्यामुळे या विभागाचे मंत्री कैलाश गेहलोत हे ध्वजारोहण करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री गोपाल राय यांनी आतिशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, अशी केजरीवालांची इच्छा असल्याने त्यानुसार नियोजन करावे, असे पत्र विभागाला दिले होते. पण प्रशासनाने त्यास नकार दिला होता. यावरून आप आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने आले होते.

आता सक्सेना यांनीही आतिशी यांच्यासह इतर बड्या नेत्यांना डावलून सक्सेना यांचे नाव पुढे केल्याने हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आतिशी यांनी काही तासांपूर्वीच सक्सेना यांच्यावर टीका करताना त्यांना व्हाइसरॉय म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT