Nitish Kumar : वक्फ जमिनींबाबत नितीश कुमारांचा मोठा निर्णय; विधानसभेची तयारी जोरात...

Waqf Land Bihar Government : वक्फ अधिनियमावरून एनडीए सरकार आणि विरोधक सध्या आमनेसामने आले आहेत.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Patna : संसदेमध्ये वक्फ (सुधारित) विधेयकावरून जोरदार गदारोळ झाला. संसदेबाहेरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. एनडीए सरकारचे आधारस्तंभ असलेल्या संयुक्त जनता दल आणि तेलगू देसम पक्षानेही संसदेत या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांनीही मोठी निर्णय घेतला आहे.

बिहारमधील वक्फ जमिनींवर 21 नवीन मदरसे उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते व बिहार सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी यावरून विरोधकांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी नितीश कुमारांचे कौतुकही केले आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाची मते आपल्या बाजूने खेचण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Nitish Kumar
Vande Bharat : मोदी सरकारच्या लाडक्या ‘वंदे भारत’ला मोठा झटका; 100 ट्रेनची ऑर्डर रद्द...

अल्पसंख्यांक समाजाचे राजकारण करणार लोक केवळ मतांचे राजकारण करतात. पण नितीश कुमार सर्व समाजाचा विकास करत आहेत. वक्फ जमिनींवर नवीन मदरशांच्या माध्यमातून शिक्षणाची चांगली व्यवस्था आणि शिक्षकांची नव्याने नियुक्ती केली जाणार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वक्फ विधेयकाला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. या विधेयकामध्ये अनेक महत्वाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. वक्फ बोर्डामध्ये हिंदू सदस्य, महिलांना संधी अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. इतर काही सुधारणाही असून त्यातील काहींवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

Nitish Kumar
Muhammad Yunus : मोहम्मद युनूस यांनी शेख हसीनांच्या परतीचे दोर कापले? एका शब्दाने केलं घायाळ...

जेडीयूचे नेते ललन सिंह यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन करताना संसदेत विरोधकांवर हल्लाबोल चढवला होता. हे विधेयक मुस्लिम विरोधी नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी पाठिंबा दिला होता. बोर्डाला पारदर्शक बनविण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com