Vande Bharat : मोदी सरकारच्या लाडक्या ‘वंदे भारत’ला मोठा झटका; 100 ट्रेनची ऑर्डर रद्द...

Modi Government Indian Railway : मागीलवर्षी भारतीय रेल्वेने 100 वंदे भारतची निर्मिती व देखभालीचे कंत्राट एका बहुराष्ट्रीय कंपनीला देण्याचे निश्चित केले होते.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सरकारला 100 वंदे भारत ट्रेनची निर्मिती आणि देखभालीचे तब्बल 30 हजार कोटींचे कंत्राट रद्द करावे लागले आहे. ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली होती. त्यामुळे ही योजना लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय रेल्वेने देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या देशातील अनेक मार्गांवर ही वातानुकूलित ट्रेन सुरू असून प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. मार्गांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने रेल्वेने मार्गीलवर्षी 100 ट्रेनसाठी टेंडर काढले होते. त्यानुसार पुढीलवर्षी जुलै महिन्यात नव्या गाड्यांच्या प्रोटोटाईपची चाचणी घेण्याचे नियोजन होते.

Vande Bharat Train
Muhammad Yunus : मोहम्मद युनूस यांनी शेख हसीनांच्या परतीचे दोर कापले? एका शब्दाने केलं घायाळ...

फ्रान्सची कंपनी आस्लटम इंडिया 100 ट्रेन बनविण्याचे कंत्राट मिळाले होते. त्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. मात्र काही आर्थिक तडजोडींवरून ही प्रक्रिया लांबत चालली होती. अखेर काहीच तोडगा न निघाल्याने ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेला पुन्हा टेंडरप्रक्रिया राबवावी लागणार असून त्यासाठीही बराच कालावधी लागू शकतो.

कंपनीने प्रति ट्रेन 150.9 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही किंमत 140 कोटींपर्यंत खाली आणण्यासाठी चर्चा सुरू होती. कंपनीकडून 145 कोटींपर्यंत किंमत कमी केलीही होती. पण त्यानंतरही रेल्वेकडून कंत्राट रद्द करण्यात आले. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेला धक्का बसला आहे.

Vande Bharat Train
Supreme Court : नाहीतर 'लाडकी बहीण'बाबत आदेश देऊ..! सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला इशारा...

सध्या भारतात 50 हून अधिक मार्गांवर वंदे भारत गाड्या धावत आहेत. त्यापैकी पाच मार्ग महाराष्ट्रामधील आहेत. हा आकडा टप्प्याटप्याने वाढवून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता नवीन टेंडर काढून त्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोठा कालावधी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com