New Delhi News : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना अंतिरम जामीन द्यायचा की नाही, याचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून शुक्रवारी जाहीर केला जाऊ शकतो. पण त्याआधीच ईडीकडून केजरीवालांच्या अडचणी वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. ईडीने आज केजरीवालांना जामीन देऊ नये, यासाठी कोर्टात प्रतिज्ञानपत्र दाखल केले आहे. तर शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करून केजरीवालांनांच मुख्य सुत्रधार म्हणून ठसवण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जाऊ शकतो.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam Case) प्रकरणात केजरीवाल मागील दीड महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. सध्या ते तिहार जेलमध्ये असून प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांच्याकडून कोर्टात करण्यात आला आहे. (Latest Political News)
सुप्रीम कोर्टामध्ये केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. ईडीने (ED) जामिनाला जोरदार विरोध केला आहे. तर लोकसभा निवडणुका पाच वर्षांतून एकदा येतात. ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन का दिला जाऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करत कोर्टाने सुचक संकेत दिले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल शुक्रवारी येऊ शकतो. पण त्याआधीच ईडीने गुरूवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रचाराचा अधिकार हा मुलभूत अधिकार नसल्याने केजरीवालांना जामीन देऊ नये, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
ईडीकडून शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते. त्यामध्ये केजरीवाल हेच घोटाळ्याचे मुत्र सुत्रधार असल्याचा दावा ईडीकडून केला जाऊ शकते. ईडीने यापुर्वीच कोर्टात हे म्हणणे मांडले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत घोटाळ्यातून मिळालेले शंभर कोटी रुपयांपैकी 45 कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने यापुर्वीच केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.