Haryana Political Crisis : निवडणुकीआधीच हरियाणातील भाजप सरकार कोसळणार? हुडा-चौटालांचा डाव

President Rule : हरियाणामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाऊ शकते. त्यासाठी जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे.
Dushyany Chautala, Nayab Singh Saini, Bhupendra Huda
Dushyany Chautala, Nayab Singh Saini, Bhupendra HudaSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh News : हरियाणातील भाजपच्या सरकारसमोरील (Haryana Political Crisis) अडचणी वाढत चालल्या आहेत. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. त्यातच आता हे सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी युध्दपातळीवर जुळवाजुळव सुरू केल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि जेजेपी हे पक्ष एकत्रित येऊन भाजपचा खेळ बिघडवण्याचे प्लॅनिंग सुरू असल्याची चर्चा आहे.

हरियाणा विधानसभेमध्ये एकूण 88 जागा असून बहुमतासाठी 45 हा जादूई आकडा आहे. मात्र, भाजप सरकारकडे (BJP Government) केवळ 43 आमदार आहत. तीन अपक्षांनी काँग्रेसला (Congress) हात धरल्याने भाजपला धक्का बसला आहे. भाजप नेत्यांकडून सरकार स्थिर असल्याचा दावा केला जात असला तरी आकड्यांचे गणित पाहिल्यास भाजप सरकार अल्पमतात असल्याचे दिसते. (Latest Political News)

Dushyany Chautala, Nayab Singh Saini, Bhupendra Huda
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत अमेरिकेची ढवळाढवळ; रशियाच्या दाव्यामुळं खळबळ

दुसरीकडे विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे पुर्वीचे मित्र जेजेपीचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनीही तसेच संकेत दिले आहेत. काँग्रेस भाजपचे सरकार पाडण्यासाठी अविश्वास ठराव आणणार असेल तर आपला पाठिंबा असेल, असे चौटाला म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौटाला यांनी हात पुढे केल्यानंतर काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा (Bhupendra Singh Huda) यांचीही प्रतिक्रिया आली आहे. जेजेपीने आम्हाला लिखित पाठिंबा दिल्यास काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू करण्याची मागणी केली जाईल, से हुडा म्हणाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि जेजेपी एकत्र आल्यास भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

दरम्यान, चौदाला यांनी भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. नायब सैनी यांनी नैतिकतेच्या आधारावर विधानसभेत बहुमत सिध्द करावे, अन्यथा त्वरित राजीनामा द्यावा. आम्ही सरकार पाडण्यासाठी विरोधकांना साथ द्यायला तयार आहोत.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात भाजप सरकारचा शपथविधी झाला तेव्हा 48 आमदारांचा पाठिंबा होता. त्यानंतर लगेच माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि रणजीत सिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. तर दोन दिवसांपुर्वी तीन अपक्ष आमदारांनीही पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे भाजपचे सरकार अल्पमतात आले आहे.

Dushyany Chautala, Nayab Singh Saini, Bhupendra Huda
Navneet Rana News : नवनीत राणांची हैदराबादेत हवा; मतदारसंघात घुसून ओवेसींना ठणकावले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com