Hyderabad News : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात सध्या आव्हान-प्रति आव्हानांची शाब्दिक चकमक उडत आहे. अमरावती मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी थेट हैदराबादमध्ये जाऊन ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi News) यांना ठणकावले होते. त्याला आता ओवेसींनीही प्रतिउत्तर दिलं आहे.
भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा (Navneet Rana) प्रचारासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. राणा यांनी यांची हैदराबाद शहरामध्ये चम्पा पेठ येथे भाजप (BJP) उमेदवार माधवी लता यांच्यासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी अतिशय आक्रमकपणे भाषण करत ओवेसींबाबत बघून घेण्याची भाषा केली होती. (Lok Sabha Election 2024)
ओवेसींनी राणांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी मोदीजींनी (PM Narendra Modi) सांगत, त्यांनी राणांना 15 सेकंद द्यावीत. तुम्ही काय करणार? 15 सेकंद कशाला एक तास द्या. तुमच्यामध्ये मानवता उरलीय की नाही, हे आम्हालाही पाहायचं आहे. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही तयार आहोत. कोण घाबरतंय? जर कुणी खुलेपणाने असे बोलत असले तर हे कराच. पंतप्रधान तुमचे आहेत, आरएसएस तुमची आहे, सगळं तुमचंच आहे. मग हे कराच. तुम्हा कोण थांबवत आहे. आम्ही कुठं यायचं ते सांगा, तिथे येऊ, असे आव्हान ओवेसींनी दिले.
काय म्हणाल्या होत्या राणा?
ओवेसी बंधूंना ललकारताना राणा म्हणाल्या होत्या की,"15 मिनिटे पोलिस हटवा आम्ही काय आहे ते सांगतो, असे तुम्ही म्हणालात. पण तुम्ही 15 मिनिटेच काय, फक्त 15 सेकंद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता, कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.