Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांना तुरुंगातच राहावं लागणार? ED नं उचललं मोठं पाऊल

Delhi Liquor Scam Case CM Arvind Kejriwal bail ED : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीतील कोर्टाने गुरूवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.

Rajanand More

Delhi Political News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्येच राहणार की बाहेर येणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. गुरूवारी दिल्लीतील कोर्टाने त्यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याविरोधात ईडीने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

दिल्ली हायकोर्टात ईडीच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. ईडीने जामीनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच जामीनालाही स्थगिती दिल्याने केजरीवालांना धक्का बसला आहे.

केजरीवालांच्या जामीन अर्जावर आपल्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली नसल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. ईडीची जामीनाला स्थगिती देण्याची मागणी कोर्टाने मान्य केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने गुरूवारी केजरीवालांना जामीन मंजूर केला. यावेळी केजरीवाल यांच्या विरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला होता.

मात्र, दिल्ली हायकोर्टाने जामीनाला स्थगिती दिल्यास किंवा ईडीच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीनाचा निर्णय रद्द केल्यास केजरीवालांना मोठा बसू शकतो. त्यामुळे कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT