Arvind Kejriwal Bail : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन; न्यायालयात नेमकं काय घडलं?

Delhi Liquor Scam : केजरीवाल यांनी दिल्लीतून मद्यविक्रेत्यांकडून मिळालेला पैसा गोव्यातील पक्षाच्या प्रचारासाठी वापरल्याचाही आरोप ईडीने केला होता.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने कथित लिकर घोटाळ्याप्रकरणी अखेर जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांच्या विरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत, असा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यानुसार केजरीवाल उद्या शुक्रवारी तुरुंगाबाहेर येतील.

केजरीवाल यांना ED ने 21 मार्च रोजी 2021-22 च्या दिल्ली मद्य धोरण तयार करताना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. केजरीवाल यांनी दिल्लीतून मद्यविक्रेत्यांकडून मिळालेला पैसा गोव्यातील पक्षाच्या प्रचारासाठी वापरल्याचाही आरोप ईडीने केला होता. मात्र याबाबत ईडीकडे कोणतेही पुरावे नसल्याचा युक्तीवाद केजरीवाल यांच्या वकिलाने केला आहे.

ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या जामीनावर जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडे कोणताही पुरावा नाही, या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.

ईडी हवेतच तपास करत नाही, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले. केजरीवाल वैयक्तिकरित्या कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसले तरीही मनी लाँन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) खटला चालवण्यास पात्र आहेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

केजरीवाल यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता विक्रम चौधरी यांनी ईडीच्या आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला. ईडी ही स्वतंत्र एजन्सी आहे की काही राजकीय सूत्रधारांच्या हातातील बाहुले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ईडी आपले सर्व निष्कर्ष गृहीतकाच्या आधारे काढते. ते अजूनही पुरावे, माहितीच जमा करत असतील, तर ही एक न संपणारी चौकशी आहे, असा आरोप केला. यानंतर त्यांनी केजरीवाल यांना इतर व्यक्तींप्रमाणेच स्वातंत्र्य दिले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Arvind Kejriwal
Nilesh Lanke News : नगरमध्ये मोठं घडणार, लंकेंच्या प्रचारसभांचे विखेंनी मागवले व्हिडिओ; पुराव्यांची जुळवाजुळव?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते 2 जून रोजी तुरुंगात परतले. त्यानतंर त्यांनी वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामीनासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र, 5 जून रोजी ट्रायल कोर्टाने तो फेटाळला होता.

ईडीने केलेले सर्व आरोप केजरीवाल यांनी फेटाळले असून ईडीवर खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आप नेत्यांमध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांचा समावेश आहे. सिसोदिया तुरुंगात असले तरी सिंग सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Arvind Kejriwal
Amabadas Danve News : मुख्यमंत्री शिंदेंची पोच कल्याण, ठाण्याच्या बाहेर नाही; ठाकरेंच्या नेत्याने डिवचले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com