New Delhi News : दिल्लीतील महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक (Delhi Mayor Election) वादात सापडली आहे. पीठासीन अधिकाऱ्याची नेमणूकच न करण्यात आल्याने आज होणारी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून आम आदमी पक्ष आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी जाणीवपूर्वक पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक केली नाही, असा आरोप आपने केला आहे. त्यामुळे चंदीगड महापौर निवडणुकीनंतर दिल्लीतील वादही आता कोर्टात पोहाेचण्याची शक्यता आहे.
दिल्ली महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक दरवर्षी होती. यावर्षी 26 एप्रिलला ही निवडणूक नियोजित होती. सध्याच्या महापौरांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करत दरवर्षी निवडणूक पार पाडण्याची परंपरा असल्याचा दावा आपने काल केला होता. (Latest Political News)
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी नेमण्याबाबतची फाइल थेट नायब राज्यपालांकडे पाठवली. पण त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत पीठासीन अधिकारी नेमण्यात आले नाहीत. काल रात्रीच त्यांच्या कार्यालयाकडून मुख्य सचिवांना निर्देशित कऱण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुचनेशिवाय पीठासीन अधिकारी नेमण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्याचे महापौर आणि उपमहापौरच या पदांवर कायम राहतील, असे नायब राज्यपालांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. दरम्यान, आपने नायब राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक होऊ द्यायची नाही, हे आधीच ठरले होते. त्यामुळे प्रशासनाने नगरविकास मंत्र्यांकडे अधिकारी नेमण्याबाबतची फाइल न पाठवता थेट नायब राज्यपालांकडे पाठवली, असा आरोप विद्यमान महापौर शैली ओबेरॉय यांनी केला आहे.
आपचे नेते दुर्गेश पाठक यांनीही भाजपवर आरोप केला. भाजप दलितविरोधी असल्याने दलित महापौर होऊ न देण्यासाठी निवडणूक घेण्यात आली नाही, अशी टीका पाठक यांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक स्थगित करण्यात आल्याने आज आपच्या नगरसेवकांनी हातात दलितविरोधी भाजप असे फलक घेत महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.