Supreme Court on EVM : EVM-VVPAT ची शंभर टक्के मोजणी नाहीच; सर्व याचिका फेटाळल्या

EVM-VVPAT Case News : ईव्हीएममधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभऱ टक्के पडताळणी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज कोर्टाने निकाल दिला.
Election Commission, Supreme Court
Election Commission, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचाच वापर होईल, पुन्हा मतपत्रिका येणार नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी सर्व याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना झटका दिला आहे.

Election Commission, Supreme Court
Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना आता खर्च सादर करावा लागणार; अन्यथा...

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे की, मतदान ईव्हीएम मशिनवरच होईल. ईव्हीएममधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी होणार नाही. पूर्वी ज्या पद्धतीने मतमोजणी होत होती, तीच पद्धत पुढेही कायम राहील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाने निकाल देताना निवडणूक आयोगाला दोन महत्त्वाचे आदेशही दिले आहेत. व्हीव्हीपॅटमधील पावत्या ४५ दिवसांपर्यंत जतन करून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच सिंबल लोडिंग युनिटही मतदानानंतर सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उमेदवारांना काही आक्षेप असल्यास मतमोजणीनंतर सात दिवसांच्या आत उमेदवार पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतात. मात्र, या सगळ्याचा खर्च उमेदवाराला करावा लागणार आहे. त्यामध्ये तथ्य आढळल्यास उमेदवाराला पैसे परत केले जातील, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

R

Election Commission, Supreme Court
Lok Sabha Election 2024 Voting LIVE : महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मतदानाची टक्केवारी घसरली; पाहा काय आहे चित्र?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com