Delhi MLAs free iPhone 16 Pro Sarkarnama
देश

Delhi MLAs free iPhone 16 Pro : CM रेखा गुप्तांनी राजधानीतील आमदारांना केलं 'स्मार्ट'; आयफोन-16प्रो, टॅब्लेट अन् आयपॅडचं मोफत वाटप...

Delhi CM Rekha Gupta Approves Free iPhone 16 Pro, iPads and Tablets for MLAs : दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेतील आमदारांना स्मार्ट फोनचं मोफत वाटप केलं आहे.

Pradeep Pendhare

Delhi Assembly gadgets decision : दिल्ली विधानसभेचा कामकाज पेपरलेससाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्मार्ट निर्णय घेतला आहे. विधानसभेतील आमदारांना मोफत स्मार्ट फोन वाटप करण्यात आले आहेत. यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांसह सर्व 70 आमदारांना सोमवारी वापरासाठी आयफोन-16प्रो, नवीन टॅब्लेट आणि आयपॅडचं वितरण करण्यात आलं आहे.

आमदारांना या स्मार्ट गॅझेटचं मोफत वाटप करता यावं, यासाठी फोन रिफर्बेसमेंट कॅपमध्ये सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा 12 वर्षांनी केली गेली. शेवटची सुधारणा 2013 मध्ये झाली होती. पूर्वी खर्चाची कमाल मर्यादा सुमारे 50 हजार रुपये होती.

दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या मोबाईल फोन खरेदीची कमाल मर्यादा अनुक्रमे दीड ते सव्वा एक लाख रुपये केली. गेल्या महिन्यात 9 जुलैला जारी केलेल्या या सुधारित परतफेडीच्या आदेशामुळे सत्ताधारी भाजप (BJP) आणि आम आदमी पक्ष यांच्यात महागड्या फोन खरेदीवरून शाब्दिक युद्ध सुरू झाले होते.

दिल्ली (Delhi) विधानसभेचा कारभार पेपरलेस करण्यासाठी CM रेखा गुप्ता यांनी पुढाकार घेतला आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, विरोधी पक्षातील आमदारांसह सर्व 70 आमदारांना अधिकृत वापरासाठी आयफोन-16प्रोचं वाटप करण्यात आलं. या नवीन स्मार्टफोन्स व्यतिरिक्त नवीन टॅब्लेट आणि आयपॅड देखील देण्यात आलं आहे.

विधानसभेनं राष्ट्रीय ई-विधान अ‍ॅप्लिकेशन (NeVA) लाँच करण्यात आलेलं आहे. जे कागदविरहित कायदेविषयक कामकाजाचं मोठा आणि महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्व आमदार त्यांच्या नवीन मोबाईल हँडसेट आणि टॅब्लेटसह कामकाजात सहभागी झाले होते, तसे ते पहिलेच सत्र ठरले. दिल्ली विधानसभा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी देशातील पहिले विधिमंडळ ठरले आहे. यासाठी 500 किलोवॅटच्या सौरऊर्जा प्रकल्प विधिमंडळाच्या छतावर कार्यान्वित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या "एक राष्ट्र, एक अर्ज" उपक्रमांतर्गत विकसित केलेला NeVA प्लॅटफॉर्म या पावसाळी अधिवेशनापासून पूर्णपणे अंमलात आणण्यात आलं आहे. NeVA प्लॅटफॉर्मचं आमदारांना देखील प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यात मायक्रोफोन, मतदान पॅनेलसह स्मार्ट डेलिगेट युनिट्स, RFID/NFC (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, निअर फील्ड कम्युनिकेशन) प्रवेश, वेगवेगळ्या भाषांचा समावेश, iPads द्वारे रिअल-टाइम दस्तऐवज, HD कॅमेऱ्यांसह स्वयंचलित AV प्रणाली, पॉवर-बॅक्ड नेटवर्किंगचा समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT