Delhi MP Apartment Fire: दिल्लीतील खासदारांच्या अपार्टमेंटला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. पहिल्या मजल्यावर लागलेली आग ही सहाव्या मजल्यापर्यंत भडकत गेली. आपार्टमेंटखाली लहान मुलं फटाके उडवत असताना पार्किंगमधला कचरा पेटून ही आग भडकल्याचं इथल्या एका रहिवाशी कर्मचाऱ्यानं सांगितलं आहे. या भीषण घटनेत तीन जण भाजले असून तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
नवी दिल्लीच्या विश्वंभर दार रोड इथल्या ब्रह्मपुत्र आपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी आग लागली. हे आपार्टमेंटमध्ये खासदारांचं निवासस्थान आहे. यातल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या जुन्या वस्तूंना ही आग लागली. त्यानंतर ही आग वाढत जाऊन आठव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत तीन जण होरपळे असून तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत एकही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये पहिल्या तीन मजले हे सर्वंट क्वार्टर्स आहेत, त्यानंतर वरच्या सर्व मजल्यांवर खासदार राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमनच्या गाड्या अर्धा तास उशीरा आल्या. या अपार्टमेंटमध्ये बसवण्यात आलेलं आग विझवण्याची यंत्रणा आजिबात काम करत नव्हती. यामध्ये पाणीचं नव्हतं. अग्निशमनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुपारी १.२२ वाजता आम्हाला पंडीत पंत मार्गाजवळ असेलल्या ब्रह्मपुत्र आपार्टमेंटमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाली. ही उंच उमारत असल्यानं आम्ही तातडीनं टीटीएलसह १४ वॉटर टँकर घटनास्थळी पाठवले. आत्तापर्यंत सर्वाधिक नुकसान हे स्टिल्ट फ्लोअरवर झालं आहे. तर वरच्या सर्व मजल्यांना बाहेरच्या बाजुनं नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
याच अपार्टमेंटमध्ये राहत असलेले संसदेतील कर्मचारी विनोद यांनी सांगितलं की, आग लागली तेव्हा माझा पाळीव कुत्रा आतमध्ये अडकून पडला होता. माझ्या मुलीचं लग्न काही महिन्यात होणार आहे, यासाठी आम्ही खरेदी केलेले कपडे, सोनं-नाणं हे देखील आतमध्ये जळून खाक झालं आहे. या आगीत माझी पत्नी आणि एक एक मुलगी भाजली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. दुसरी मुलगी बाहेर असल्यानं ती बचावली. माझं घर तिसऱ्या मजल्यावर आहे. काही मुलं पार्किंग एरियामध्ये फटाके फोडत होते, तसंच पार्किंगमध्ये काही जुन्या वस्तू आणि कचरा पडलेला होता. फटाक्यांमुळंच या कचऱ्याला आग लागून ती नंतर भडकली असल्याची शंका विनोद यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या संसदेचं अधिवेशन सुरु नसल्यानं या अपार्टमेंटमध्ये देशभरातील खासदार वास्तव्यास नसावेत. पण जरी स्थानिक खासदार राहत असतील तर या आगीचा फटका कुठल्या खासदाराला बसला आहे किंवा नाही? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.