Delhi Police Commissioner Anurag Kumar Sarkarnama
देश

CJP Protest : अभिजीत दिपकेंच्या आंदोलनातील धक्कादायक माहिती उघडकीस; दिल्ली पोलिसांनी ज्या गुन्हेगारांना आंदोलक म्हटले, ते होते तुरुंगात...

Delhi Police, Cockroach Janata Party, CJP Protest Violence : फेशियल रेकग्निशनवर प्रश्नचिन्ह; दिल्ली पोलिसांनी आंदोलक म्हणून ओळखलेले २५ आरोपी त्या वेळी तिहार, मंडोली आणि रोहिणी तुरुंगात असल्याचा खुलासा.

Rajanand More

Delhi Protest news : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान २० जुलैला मोठा हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. यादिवशी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने ते जखमी झाले होते. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी आंदोलनात अनेक गुन्हेगारही सहभागी झाल्याचा दावा केला होता.

पोलिसांनी फेशियल रेकग्निशन कॅमेराच्या माध्यमातून तब्बल २ हजार ८७३ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले होते. त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर इतर विद्यार्थी आंदोलकांवर देशभरात दाखल झालेल्या गुन्हे रद्द करण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते. मात्र, आता दिल्ली पोलिसांच्या दाव्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, जंतरमंदरवरील CJP आंदोलनात सहभागी असलेल्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, पोक्सो असे गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. हिस्ट्रीशीटर्स असा उल्लेख पोलिसांनी केला होता. पोलिसांनी माहिती दिलेल्या या गुन्हेगारांपैकी सुमारे २५ जण त्यावेळी दिल्ली पोलिसांच्याच तुरुंगात होते.

दिल्ली पोलिसांच्या दाव्याची या माहितीमुळे पोलखोल झाली आहे. तुरुंगात असलेले आरोपी आंदोलनात असणे, अशक्य आहे. मग पोलिसांनी नेमकी कोणत्या व्यक्तींचे चेहऱ्यांचे फोटो घेऊन ओळख पटविली, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमधूनच हे आरोपी तुरुंगात असल्याची माहिती समोर आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, २ हजार ८७३ गुन्हेगारांपैकी १००१ जणांवर हत्या, ६१ जणांवर बलात्कार, ६ जणांवर पोक्सो, ३७ जणांवर हत्येचा प्रयत्न असा आरोप आहेत. त्यापैकी सुमारे २५ जण हे आंदोलनादरम्यान तिहार, मंडोली आणि रोहिणी येथील तुरुंगात होते. यामध्ये १७ जणांवर हत्या, चार जणांवर बलात्कार आणि चार जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा खटला सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT