UP Assembly Election 2027 : उत्तर प्रदेशाच्या राजकारणात धमाका? अखिलेश यादव अन् CJP नेत्यामध्ये बंद दाराआड खलबतं, चर्चांना उधाण

Akhilesh Yadav Ashutosh Ranka meeting : जंतरमंतर आंदोलनातील पाठिंब्यानंतर लखनऊमध्ये दीड तास बंद दाराआड चर्चा; सीजेपीचा समाजवादी पक्षाला खुला पाठिंबा की फक्त दबावाचे राजकारण?
Ashutosh Ranka, Akhilesh Yadav CJP meeting
Ashutosh Ranka, Akhilesh Yadav CJP meetingSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीवर दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचेही सावट असणार आहे. या आंदोलनाला उत्तर प्रदेशातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सीजेपीच्या एका नेत्याने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्याने यूपीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी गुरूवारी लखनऊ येथे अखिलेश यादव यांची भेट घेतली. तास-दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर आता राजकीर्य वर्तुळात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. जंतरमंदरवरील आंदोलनादरम्यान अखिलेश यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला होता. त्यांनी सातत्याने या आंदोलनाची पाठराखण केली आहे. खुद्द अखिलेश यादव यांनीही संसदेत लाठीचार्जवरून सरकारला धारेवर धरले होते.

दरम्यान, ही बैठक औपचारिक असल्याचा दावा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. फखरुल हसन यांनी सांगितले की, दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. सीजेपीचे नेते केवळ आभार मानण्यासाठी आले होते. समाजवादी पक्षाने ज्याप्रकारे युवकांचा मुद्दा समजून घेत जंतरमंतरवर पाठिंबा दिला, त्यावरही ही भेट होती. सीजेपीच्या राजकीय भूमिकेबाबत आमचा पक्ष कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.

Ashutosh Ranka, Akhilesh Yadav CJP meeting
Supreme Court Shiv Sena case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंची भिस्त असलेल्या मुद्दालाच शिंदेंच्या वकिलांनी हात घातलाय; गेमचेंजर ठरणार?

रांका यांनी मात्र या भेटीवर भाष्य करणे टाळले. तसेच सीजेपीकडूनही याबाबत कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आपण केवळ दबाव गट म्हणून काम करणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. राजकीय पक्ष म्हणून सीजेपी पुढे येणार नाही, असे सांगतानाच त्यांनी देशभरात संघटन मजबूत करण्याबाबतही सांगितले होते.

Ashutosh Ranka, Akhilesh Yadav CJP meeting
Rahul Gandhi news : वडिलांचं डोकं फोडलं, आरोपी मंत्र्यांमुळे मोकाट, मला मदत करा! निशूने आवाज उठवताच राहुल गांधींनी दिला आधार, दिल्लीत घमासान

पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह गुजरात व अन्य काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. मात्र, देशाचे लक्ष सर्वाधिक उत्तर प्रदेशकडे आहे. हे देशातील सर्वात मोठे राज्य असून लोकसभेच्या सर्वाधिक जागाही याच राज्यात आहेत. त्यामुळे यूपीतील सत्ता शाबूत ठेवण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे.

दुसरीकडे समाजवादी पक्षानेही सत्ता काबीज करण्यासाठी सर्वप्रकारेच प्रयत्न सुरू केले आहेत. यापार्श्वभूमीवर रांका यांच्यासोबत झालेली भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. सीजेपी यादव यांना उघडपणे पाठिंबा देणार की सोशल सपोर्ट करणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com