CJP Protest March: कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनला प्रतिसाद देत दिल्लीत जेनझी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. संसदेच्या दिशने निघाणाऱ्या नियोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी हे तरुण दिल्लीत दाखल झाले आहेत. लाखोंच्या संख्येन हे लोक दिल्लीच्या रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यातच आता सरकारनं हे आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी केला आहे. कारण सरकारनं केवळ १० मिनिटांचा चर्चेचा फार्स दाखवला तर दुसरीकडं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता या आंदोलनाचं काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी हा दावा केला आहे. पण पोलीस दिपकेंना नेमकं कुठे घेऊन गेले? हे अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत पोलिसांकडूनही कुठलीही अपडेट अद्याप देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी सरकारनं सकाळी सीजेपीच्या आंदोलकांना निमंत्रिण दिलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा या आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करणार होते. या चर्चेसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि अभिजीत दिपकेंचे सहकारी अशुतोष रांका आणि सौरव दास यांनी उपस्थिती लावली. नड्डा यांच्या भेटीसाठी या दोघांना तब्बल २ तास वाट पाहावी लागली. पण भेटीनंतर केवळ १० मिनिटांतच त्यांच्यातील चर्चा संपली, अशी माहिती या दोघांनी दिली. पण या चर्चेदरम्यान अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं एकीकडं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या दोन प्रमुख आंदोलकांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलं आणि दुसरीकडं आंदोलनातील महत्वाची तीसरी व्यक्ती असलेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आंदोलकांशी चर्चेचा सरकारचा केवळ फार्सच होता की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, सीजेपीच्या मोर्चाला तरुणांची वाढती गर्दी लक्षात घेता दुसरीकडं ज्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु आहे, ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमध्ये ते आपला राजीनामा सुपूर्द करतात का? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण अद्याप प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.