Delhi Flood Sarkarnama
देश

Delhi Politics : नेतेगिरीचं करायचं काय? तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर राजकीय आरोपांचा ‘पूर’

UPSC Aspirants Delhi Flood AAP BJP : दिल्लीतील एका कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.

Rajanand More

Delhi Flood : दिल्लीतील पावसाने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा बळी घेतला आहे. एका कोचिंग क्लासच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यावर देशाच्या राजधानीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. रविवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

भाजप, आपसह काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर दुसरीकडे दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगरमधील राव आयएएस स्टडी सर्कलबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

भाजपचे आपवर आरोप

घटनेनंतर भाजपने सत्ताधारी आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. स्थानिक आमदारांनी नाल्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले. अरविंद केजरीवाल, आतिशी आणि त्यांच्या सरकारच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी. दिल्ली महापालिकेने नाल्यांची सफाई का केली नाही, याचीही चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा यांनी केली आहे.

भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज यांनीही आपला जबाबदार धरले आहे. अरविंद केजरीवाल आणि आमदार दुर्गेश पाठक या मृत्यूला जबाबदार असल्याचे बांसुरी यांनी म्हटले आहे. या आरोपांना पाठक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नगरसेवक 15 वर्षे दिल्ली महापालिकेत सत्तेत होते. पण नाल्यांची सफाई केली नाही. ही वेळ राजकारणाची नाही. आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे पाठक म्हणाले.

स्वाती मालीवाल मैदानात

आपच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली. यावेली त्यांनी आप नेत्यांवरच निशाणा साधला. तीन मुलांच्या मृत्यू जबाबदारी कोण घेणार? दहा दिवसांपासून ड्रेनेजच्या साफसफाई मागणी होत होती. पण कार्यवाही झाली नाही. बेकायदेशीर बेसमेंट भ्रष्टाचाराशिवाय चालू शकत नाही. महापौर आणि आमदारांनी एसी रूममधून बाहेर पडावे, अशी टीका त्यांनी केली आहे. यांसह भाजप व आपचे इतर नेतेही एकमेकांवर तुटून पडले आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. 24 तासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. राव क्लासेसच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आह. बेसमेंटमध्ये बेकायदेशीरपणे क्लास चालवला जात असल्याचेही समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT