Delhi Pollution Sarkarnama
देश

Delhi Government : दिल्लीत मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

Work From Home Delhi Pollution rise AAP Government : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती अधिकच बिकट होत चालल्याने सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Rajanand More

New Delhi : देशाची राजधानी दिल्लीभोवती प्रदुषणाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालयांमधील वर्ग ऑनलाईन सुरू करण्यात आले आहे. तसेच सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फॉर्म होम’चा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीतील 50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, दिल्लीतील प्रदुषण कमी करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीतील 50 टक्के सरकारी कर्मचारी घरून काम करतील. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांचा समावेश नसेल.

अत्यावश्यक सेवांवर परिणाम न होऊ देता, दिल्लीतील प्रदुषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दुपारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. मागील दोन दिवसांत प्रदुषण काही प्रमाणात कमी झाल्याचेही राय यांनी सांगितले. दिल्लीतील प्रदुषणाची पातळी बुधवारी अति धोकादायक पातळीवर पोहचले आहे.

मागील आठवड्यातच दिल्लीतील सरकारी कार्यालये आणि महापालिकेच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पढील वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बदललेल्या वेळा कायम राहतील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा वगळता सर्व मोठ्या वाहनांची दिल्लीतील वाहतुक बंद करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या डिझेलवरील बसेसलाही बंदी घालण्यात आली आहे.  

सुप्रीम कोर्टाने याबाबत दिल्ली सरकारसह प्रदुषण मंडळावरही मंगळवारी ताशेरे ओढले. उपाययोजना करण्यात विलंब केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये शेतात पराली पेटवण्याच्या घटनाही थांबताना दिसत नाही. त्यासाठी पंजाब सरकारकडून कारवाई केली जात आहे. मात्र, त्यानंतरही प्रदुषणावर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT