New Delhi : विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली आले. या हॉटेलमधून सुमारे नऊ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच तावडेंवर आंचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल कऱण्यात आला आहे. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले असून दिल्लीतून भाजपची पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.
भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मविआकडून शेवटचा प्रयत्न म्हणून निराधार आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्षाची अनेक कामे पाहत असल्याचे त्रिवेंदी म्हटले आहे.
नालासोपारा मतदारसंघातील उमेदवाराने आयोजित केलेल्या एका बैठकीत सहभागी होण्याबाबत तावडेंना आग्रह केला होता. ते तिथूनच जात असल्याने त्यांनी सहमती दर्शवली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदानप्रक्रियेची माहिती देण्यासाठी अशा बैठका घेतल्या जातात. संबंधित हॉटेल आणि आजबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासावेत. पाच कोटी रुपये खिशात तर आणले जाऊ शकत नाहीत. त्यांनी पुरावे दाखवावेत आणि निराधार आरोप करू नये, असे सांगत त्रिवेदी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, पैसे वाटपावरून विरारमधील हॉटेलमध्ये मोठा राडा झाला. त्यानंतर विनोद तावडे, उमेदवार राजन नाईक आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी हॉटेलची झाडाझडती घेतल्यानंतर नऊ लाखांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. तावडेंच्या ताफ्यातील वाहनांचीही तपास करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तावडे यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. महाविकास आघाडीने तावडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत महायुतीवर निशाणा साधला जात आहे. मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच हा प्रकार घडल्याने आघाडीच्या हाती आयते कोलित लागले आहे. पण महायुतीतील नेत्यांकडूनही आघाडीकडून निराधार आरोप केले जात असल्याचा पलटवार करत तावडेंना क्लिन चीट दिली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.