Rahul Gandhi 1 Sarkarnama
देश

Delhi congress news : काँग्रेस दिल्लीत सलग तिसऱ्यांदा 'शून्यात'; राहुल गांधींचं नेमकं कुठं चुकलं?

Delhi Vidhan Sabha Elections 2025 Congress party Rahul Gandhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.

Pradeep Pendhare

Delhi Vidhan Sabha Elections News : दिल्लीत दबदबा असलेल्या काँग्रेस पक्षाला यंदा पुन्हा शून्यावर राहावं लागले. सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सलग तिसऱ्यांदा एकही उमेदवार दिल्लीत निवडून आणता आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला कमबॅग करून दिले. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं नेमकं कुठे चुकले याची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्ली 1993मध्ये भाजपची (BJP) सत्ता होती. ही सत्ता काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1998 मध्ये खेचून घेतली. काँग्रेसने 52 जागा जिंकल्या आणि शीला दीक्षित मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेसवर मजबूत पकड होती. सलग तीन वेळा त्या मुख्यमंत्रीपदी राहिल्या. 1998 मध्ये 52, 2003 मध्ये 47 आणि 2008 मध्ये 43 जागा जिंकल्या. काँग्रेसने तिसऱ्यांदा मिळवलेल्या विजयानंतर लालकृष्ण अडवाणी आणि इतर भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

2013च्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला (Congress) सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरून रान पेटवलं. पुढं अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. दिल्लीकरांनी काँग्रेस आणि भाजपाला नाकारलं आणि ‘आप’च्या झोळीत भरभरून मतं टाकली.

2013मध्ये दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने 28 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून शीला दीक्षित यांचा पराभव केला. काँग्रेसला आठ जागा मिळाल्या. भाजपला त्यावेळी सर्वाधिक 31 जागा मिळाल्या. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिला आणि अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आप अन् काँग्रेसचं बिनसलं

भ्रष्टाचारी कायदा लागू करण्याची तयारी करणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचां काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला. आप सरकार कोसळले. 2015ला आपने 70 पैकी 67जागा मिळवल्या आणि काँग्रेस दिल्लीत पहिल्यांदा शून्य झाली. 2020 मध्ये आपने पु्न्हा 62 जागा मिळवत यश मिळवले. यावेळी काँग्रेसला पुन्हा भोपळा फोडता आला नाही. 2025मध्ये भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आहे. पण आप आणि भाजपमध्ये लढत झाली. यावेळी तिसऱ्यांदा काँग्रेसच्या हाती भोपळा आला आहे.

आजारपणामुळे प्रचारात अनुपस्थिती

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. आप आणि काँग्रेसची आघाडी होईल, असे वाटत असताना ती झाली नाही. यातच राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आजारी होते. ते प्रचारात देखील सहभागी झाले नाहीत. प्रचाराची सर्व सूत्र राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडे होती. त्यांनीही निवडणुकीच्या प्रचारात जोर लावला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मायक्रो नियोजनापुढे काँग्रेस आणि आप पूर्णपणे निष्प्रभ ठरली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT