CJP Delhi protest Sarkarnama
देश

CJP Delhi protest : दिल्लीतील हिंसाचार खटकला; मोदी सरकारमधील मंत्रीही 'सरकारी' भूमिकेविरोधात पहिल्यांदाच थेट बोलले...

Chirag Paswan, Ramdas Athawale : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर सरकारमधील मंत्र्यांचीही नाराजी; चिराग पासवान, रामदास आठवले यांनी पोलिस कारवाईला पाठिंबा देण्यास नकार.

Rajanand More

Delhi violence update : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद मार्चदरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थी व तरूणांवर लाठीचार्ज केला होता. अनेकांना बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. काही विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलकांना झालेल्या मारहानीवरून विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता सरकारमधील मंत्रीही त्यावर बोलू लागले आहेत.

जखमी आंदोलकांची मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सोमवारच्या लाठीचार्जनंतर त्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी तरूण रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. याअनुषंगाने केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी नड्डा यांची भेट घेतली.

पासवान यांनी नड्डा यांच्या भेटीनंतर मीडियाशी बोलताना सीजेपीच्या आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले, मी विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करतो. विविध मुद्द्यांवर संताप आणि चिंता वाटत असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले, हे स्वाभाविकच आहे. त्याचवेळी मी विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याच्या बाजूने अजिबात नाही.

पासवान यांनी संवाद हे चांगले माध्यम असल्याचे सांगत म्हटले की, चर्चेसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. काहीवेळा तीव्र संतापामुळे मर्यादा ओलांडल्या जातात आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी कठोर कारवाई करावी लागते. पण या कारवाईचे मी समर्थन करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आठवलेंचीही नाराजी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही दोन्ही बाजूच्या हिंसाचाराचे अजिबात समर्थन केले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चाला परवानगी नव्हती. त्यानंतरही मार्च काढण्यात आला. त्या कारणाने पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या हिंसेचे मी समर्थन करू इच्छित नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT