Shiv Sena UBT : ओमराजेंसह 6 खासदारांना विलीनीकरण भोवणार? अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंची 'सुप्रीम' चाल...

Om Birla, Eknath Shinde, rebel MPs, : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टात धाव; सहा खासदारांच्या विलीनीकरणावर तातडीची सुनावणी नाकारल्याने राजकीय अनिश्चितता वाढली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court update : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आता संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंनी बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

ओम बिर्ला यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील-आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विलीनीकरणाला अधिवेशनाआधी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या विलीनीकरणाला मान्यता देऊ नये, अशी विनंती ठाकरेंच्या शिवसेनेने बिर्ला यांच्याकडे केली होती.

विलीनीकरणाला मान्यता दिल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात त्याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंगळवारी कोर्टात करण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख करत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

Uddhav Thackeray
IPS Abhijeet Patil news : मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याची धडाकेबाज कामगिरी; बिश्नोई गँगसह अन्य टोळ्यांना आणलं वठणीवर...

याचिकेवर कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने ठाकरेंना लगेचच दिलासा मिळू शकला नाही. तातडीने सुनावणी घेण्याचे कारण कोर्टाने वकिलांना विचारले होते. त्यावर कामत यांनी कोर्टात सांगितले की, राजकीय पक्ष म्हणून संसदेतील कामकाज ठप्प झाले आहे. लोकसभा अध्यक्षांनी सहा खासदारांच्या दुसऱ्या पक्षातील विलीनीकरणाला मान्यता दिली आहे.

Uddhav Thackeray
मोदी सरकारचे CM विजय यांना मोठं गिफ्ट; सर्वात अनुभवी IAS अधिकाऱ्यासाठीचा आग्रह केला मान्य...

संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती कामत यांनी कोर्टात केल्याचे 'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कोर्टाने उद्या किंवा शुक्रवारीच सुनावणी घेतली जाईल, असे कोणतेही आश्वासन देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोर्टात सहा खासदारांच्या विलीनीकरणावर लगेचच सुनावणी होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत सहा खासदारांचे टेन्शन मात्र वाढविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com