Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Modi Government news : मोठी बातमी : 'डिलिमिटेशन'साठी मोदी सरकारकडे 371 खासदारांचा पाठिंबा; SC, ST मतदारसंघांबाबतही महत्वाची माहिती समोर

Narendra Modi, 371 MPs Support, Two Thirds Majority, Lok Sabha MPs : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. विधेयकाला विरोध करावा, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली.

Rajanand More

Delimitation Bill 2026 : केंद्र सरकारकडून सोमवारी लोकसभेत परिसीमन विधेयक मांडले जाणार आहे. मागील अधिवेशनात या विधेयकाच्या बाजूने अपेक्षित दोन तृतियांश खासदारांनी मतदान केले नव्हते. त्यामुळे सरकारचा पराभव झाला होता. आता सरकार पूर्ण तयारीनिशी हे विधेयक सादर करणार असल्याचे दिसते. या विधेयकाला जवळपास ३७१ खासदार पाठिंबा देऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात परिसीमन विधेयक सादर होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. विधेयक पारित होण्यासाठी लोकसभेत दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. मात्र, एनडीए सरकारकडे मागील अधिवेशनात तेवढे संख्याबळ नव्हते. आता डीएमकेसह अन्य विरोधी पक्षांना सोबत घेत सरकारने आकड्यांची जुळवाजुळव केल्याची चर्चा आहे.

'पीटीआय'च्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारकडे किमान ३७१ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सरकारमधील सुत्रांनी केला आहे. दोन तृतियांश म्हणजे ३६० खासदारांची सरकारला आवश्यकता आहे. पण इतर पक्षांना सोबत घेत सरकारने त्याहून अधिक म्हणजेच ३७१ पर्यंतची जुळवाजुळव केली आहे.

एससी-एसटी आरक्षित मतदारसंघ

सरकारमधील सुत्रांनी एससी-एसटी आरक्षणावर बोलताना सांगितले आहे की, प्रस्तावित परिसीमन विधेयकानुसार देशात ३३ टक्के महिला आरक्षणासह एससी आणि एसटी आरक्षित मतदारसंघांमध्येही ५० टक्के वाढ होईल. परिसीमन आयोगामध्ये अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी सुचविलेले निवडणूक आयुक्त आणि प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा समावेश असेल.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. विधेयकाला विरोध करावा, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मात्र, ही भेट निष्पळ ठरली आहे. विधेयकाला आपला पाठिंबा कायम असल्याची भूमिका स्टॅलिन यांनी या बैठकीनंतर मांडली. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT