Deputy Collector Letter Viral  sarkarnama
देश

Deputy Collector Letter Viral : उपजिल्हाधिकाऱ्याचे पत्र व्हायरल, सही ऐवजी अंगठा, सुट्टीही झाली मंजूर!

UP Deputy Collector : उपजिल्हाधिकाऱ्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात रजा मागताना त्यांनी स्वाक्षरी ऐवजी अंगठा दिला आहे.

Roshan More

Deputy Collector News :उपजिल्हाधिकाऱ्याचा रजेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या रजेच्या अर्जावर उपजिल्हाधिकाऱ्याने सही नाही तर अंगठा लावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज वाचल्यानंतर लगेच त्यांची रजा देखील मंजूर केली.

उत्तर प्रदेशातील बालिया जिल्हातील उपजिल्हाधिकारी अलोक प्रताप सिंह यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या वडिलांना त्यांचा पाळवी कुत्रा त्रास देत होता. त्यामुळे उपजिल्हाधिकारी सिंह हे वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये आले असता कुत्र्याने त्यांच्या दोन्ही हाताला जावा घेतला.

सिंह यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे त्यांना स्वाक्षरी देखील करणे शक्य नाही. उपचारासाठी रजा मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला असून त्यावर स्वाक्षरी न करता अंगठा दिला आहे. सिंह यांच्या अर्जावर निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने आठ दिवसांची रजा मंजूर केली आहे.

अर्जामध्ये नेमके काय?

सिंह यांनी केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, आपल्या पाळीव कुत्र्याने दोन्ही हाताला चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे स्वाक्षरी करण्यास आणि दैनंदिन कामे करण्यास मी असमर्थ आहे. आपल्याला उपचारासाठी 13 मार्चपर्यंत सुट्टी मिळावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT