Veteran Malayalam actor and former Kerala BJP vice president Devan has resigned from both his party post and primary membership, citing differences over his political beliefs and ideals. Sarkarnama
देश

BJP news : अमित शहांशी चर्चेनंतर पक्ष विलीन केला अन् आता त्याच नेत्याचा भाजपला रामराम; जाहीर कार्यक्रमात केली घोषणा

Devan Kerala BJP, Kerala politics : केरळ भाजपमध्ये निधी गैरवापर, गटबाजी आणि नेतृत्वाकडून दुर्लक्षाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष देवन यांचा राजीनामा; कनिचुकुलंगरा मंदिरातील जाहीर घोषणेनंतर अंतर्गत कलह उघड.

Rajanand More

BJP resignation news : दक्षिण भारतातील राजकारणात भाजपला सातत्याने धक्के बसत आहे. तमिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता केरळमधील ज्येष्ठ नेत्यालनेही पक्षाला रामराम ठोकला आहे. ज्येष्ठ मल्याळम चित्रपट अभिनेते आणि केरळ भाजपचे उपाध्यक्ष देवन यांनी रविवारी पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

देवन यांनी एका कार्यक्रमात पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करत उपाध्यक्ष पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. समाजसुधारक नारायण गुरु यांच्या विचारांपासून भाजप दूर गेल्याचा आरोप देवन यांनी केला आहे. केरळ भाजपमध्ये सध्या अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीतील निधीचा खासगी वापरासाठी गैरवापर, गटबाजी, नेतृत्वाचे दुर्लक्ष आदी आरोप होत आहे.

पक्षातील वादाच्या पार्श्वभूमीवर देवन यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. देवन यांची २००४ मध्ये राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांनी केरळ पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. मात्र, राज्यात त्यांच्या पक्षाला यश मिळाले नव्हते. त्यांनी २०२१ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार भाजपमध्ये आपला पक्ष विलीन केला होता. देवन यांनी २००४ आणि २००६ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

देवन हे २०२३ पासून भाजप केरळचे उपाध्यक्ष होते. आपल्या राजीनाम्याविषयी सविस्तरपणे बोलताना ते म्हणाले, नारायण गुरु यांच्या प्रगतिशील सामाजिक न्यायाच्या विचारधारेपासून भाजप दूर गेला आहे. माझे राजकारण गुरुंच्या विचारांवर आधारलेले आहे. मात्र मागील पाच वर्षांत पक्षात ते कुठेच दिसले नाहीत. माझ्या राजकीय भूमिकेशी पक्ष सुसंगत नसल्याचे जाणविले. त्यानंतरही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी जोमाने काम केले, असेही देवन यांनी म्हटले आहे.

पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय वर्षाच्या सुरूवातीलाच घेतला होता, पण याबाबतची घोषणा कनिचुकुलंगरा मंदिरातच करण्याची वाट पाहत होतो, असे देवन म्हणाले आहेत. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या आणि नंतर जेपीसीकडे पाठविण्यात आलेल्या परकीय योगदान नियमन कायद्यावरूनही केरळमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची भीती नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर देवन यांच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT