Dimagi Naxal : पंतप्रधान मोदी नेमकं कुणाला म्हणाले 'दिमागी नक्षल'? किरेन रिजिजू यांनी यादीच टाकली...

Kiren Rijiju news, PM Narendra Modi : किरण रिजिजूंचा खुलासा: सर्व विरोधक नव्हे, फक्त माओवादी विचारसरणीला पाठबळ देणारे, फुटीरतावाद्यांना साथ देणारे आणि कलम ३७० समर्थकांनाच ‘दिमागी नक्षल’ म्हणण्याचा दावा.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi remark : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी यांनी नक्षलवादाला मुळापासून उखडून टाकल्याचे सांगत देशाचे अभिनंदन केले. मात्र, आपण सशस्त्र नक्षलवादावर नियंत्रण मिळविले असले तरी ‘दिमागी नक्षल’ संधीच्या शोधात असल्याचे विधान पंतप्रधानांनी यावेळी केले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या 'दिमागी नक्षल' याबाबतच्या विधानावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी आपण 'दिमागी नक्षल' असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियातूनही आता दिमागी नक्षल पार्टी अशा पोस्ट सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधानांच्या या विधानावर खुलासा केला आहे. त्यांनी हे विरोधी पक्षातील नेत्यांना 'दिमागी नक्षल' म्हटलेले नाही, असे सांगत रिजिजू यांनी केवळ काही लोकांना 'दिमागी नक्षल' म्हटल्याची पोस्ट सोशल मीडियात केली आहे. रिजिजू यांनी तीन प्रकारचे लोक 'दिमागी नक्षल' मध्ये मोडत असल्याचे म्हटले आहे.

PM Narendra Modi
Congress News : भाजपमधील बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? राहुल गांधींसह खासदाराकडूनही संकेत

माओवाद्यांना समर्थन देणारे आणि भारतीय संविधान नाकारणारे, फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहणारे आणि कलम ३७० ला समर्थन देणारे तसेच ‘चिकन नेक’ हा भाग कापून ईशान्य भारताला भारतापासून वेगळे करण्याची इच्छा व्यक्त करणारे... असे तीन प्रकार रिजिजू यांनी सांगितले आहेत. त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यामध्ये आसाम आणि भारताला वेगळे करण्याबाबतचे विधान केले जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यासह अन्य काही नेत्यांनी 'दिमागी नक्षल' असल्याचा अभिमान वाटत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात केल्या आहेत. सध्या 'दिमागी नक्षल' हा मुद्दा सोशल मीडियात ट्रेंडिंग होत आहे.

PM Narendra Modi
Abhijeet Dipke news : वर्गातच मुख्याध्यापकाच्या हातात बाटली अन् झोपलेल्या अवस्थेतील व्हिडिओ आला समोर; अभिजीत दिपकेंचा आंदोलनाचा इशारा

काय म्हणाले होते पंतप्रधान?

देशातून नक्षलवाद उखडून टाकल्याचे सांगतात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, वर्षानुवर्षे माओवादी विचारसरणीचे लोक सार्वजनिक जीवनात तसेच सरकारच्या समित्यांमध्ये होते. त्याचा विविध उपक्रमांवर परिणाम झाला. आपण सशस्त्र नक्षलवादावर नियंत्रण मिळविले असले आणि नक्षलवादी संपले असले तरी ‘दिमागी नक्षल’ संधीच्या शोधात आहेत. हिंसाचाराच्या मार्गाने ते देशाला चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com