Devendra Fadnavis Sarkarnama
देश

Devendra Fadnavis News : ठाकरेंनंतर आता केजरीवालांची बारी! देवेंद्र फडणवीसांची तोफ दिल्लीत धडाडणार

Sunil Balasaheb Dhumal

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 48 जागांसाठी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत जोरदार लढत झाली. प्रचारात सत्ताधारी - विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राज्यातील वातवारण चांगलेच तापले होते. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आघाडीतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. त्याला शिंदे आणि फडणवीसांनी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले. ठाकरेंचा समाचार घेतल्यानंतर फडणवीस आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधणार आहेत. Devendra Fadnavis News

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्प्यांतील मतदान झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadnavis दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत. दिल्लीतील सर्व सात जागांसाठी सहाव्या टप्प्यात म्हणजे 26 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस भाजपच्या उमेदवारांसाठी दिल्लीत प्रचार करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात येत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली होती. त्यास फडणवीस सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यांत राज्यातील सर्व ४८ जागांसाठी मतदान झाले. या काळात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग केली. तर सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवरून विरोधकांतील ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी खिंड लढवली. या नेत्यांनी राज्यातील प्रचारात चांगलीच रंगत भरली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागासाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तेथील भाजपच्या उमेदवारांसाठी राज्यातून देवेंद्र फडणीवस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असतील. त्यांच्या बुधवारी (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) दिल्लीत सभा होणार आहेत. तसेच त्यांचा रोड शो देखील होणार असल्याची माहिती आहे. आता या सभांतून ते केजरीवाल Arvind Kejariwal यांचा हिशेब कसा चुकता करतात, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT