Pune Hit And Run Case : आमदार टिंगरे अन् बिल्डर विशाल अगरवाल यांच्या जुन्या नात्याचा 'अर्थ' कोण सांगणार?

Sunil Tingre News : मी पोलिसांवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करावे, अशी मागणी करत टिंगरेंनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठणकावून सांगितले.
Sunil Tingre, Vishal Agarwal
Sunil Tingre, Vishal Agarwal

Pune Crime News : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे अपघातानंतर पोलिस चौकीमध्ये गेल्याने राजकीय दबावाच्या आरोपांना बळ मिळाल्याची चर्चा आहे. यावर सुनील टिंगरेंनी प्रसारमाध्यमांसमोर येत खुलासा केला आहे. Pune Hit And Run Case

टिंगरे Sunil Tingre म्हणाले, अशा प्रकारच्या अपघाताची घटना माझ्या मतदारसंघात घडली, त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. रविवारी रात्री तीन वाजून 21 मिनिटांनी माझ्या पीएचा फोन आला की मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांसह विशाल अगरवाल यांचाही फोन आला. ते म्हणाले माझ्या मुलाकडून अपघात झाला असून त्याला मारहाण झाली आहे. त्यानंतर मी पोलिस स्टेशनला पोहचलो. घडलेल्या सर्व प्रकाराची पोलीसांनी मला माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितले होते. मृतांच्या नातेवाईकांशी देखील बोलल्याचेही टिंगरेंनी यावेळी स्पष्ट केले.

मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतले आली. याबाबत वारंवार पोलिस आयुक्तांना Pune Commissioner निवेदनही दिलेली आहेत. तसंच विधिमंडळात याबाबत प्रश्नही उपस्थित केला आहे, याकडेही टिंगरेंनी लक्ष वेधले. त्यानंतर त्यांनी अगरवाल यांच्याशी असलेल्या संबंधाबाबतही खुलासा केला.

टिंगरे म्हणाले, अग्रवाल यांच्यासोबत माझे व्यावसायिक संबंध आहेत, असं बोलले जात आहे. मात्र मी राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांच्याकडे नोकरी करायचो. त्यांच्या कंपनीत मी अभियंता म्हणून काम केलेले आहे. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे, असे सांगत टिंगरेंनी अगरवाल यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Sunil Tingre, Vishal Agarwal
Gajanan Kirtikar : गजानन कीर्तीकरांचे दोन दिवसांत दोन खळबळजनक दावे; नेमके काय म्हणाले?

दरम्यान, आमदार टिंगरेंनी पोलिसांवर दबाव आणला. आरोपीला पिझ्झा, बर्गर खाण्यास दिल्याचा आरोप होत आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यावरही त्यांनी स्पष्टीकरण देत थेट सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी केली. ते म्हणाले, मी पोलिसांवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करावे, अशी मागणी करत टिंगरेंनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणाची चर्चा आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी याबाबत व्हिडिओ ट्विट करून मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सोमवारी (ता. 21) पुणे पोलिस आयुक्तांची अचानक भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघाताची सखोल माहिती घेत कर्तव्यात कोणतीही कसर ठेवू नये अशी सूचनाही पोलिसांना दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Tingre, Vishal Agarwal
Pune Hit And Run Case : हॉटेलमध्ये लपून बसलेल्या विशाल अग्रवालला पकडण्यासाठी पोलिसांनी 'असा' रचला मास्टर प्लॅन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com