Devendra Prasad Yadav, Lalu Prasad Yadav
Devendra Prasad Yadav, Lalu Prasad Yadav Sarakarnama
देश

Lalu Prasad Yadav : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादवांना धक्का! राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सोडला पक्ष

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, पहिल्या टप्प्यातील मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक असताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे. कारण, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र प्रसाद यादव यांनी RJDवर गंभीर आरोप करत, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशभरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवाय पक्ष फोडाफोडीचं राजकारणही वाढलं आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून संधी न मिळाल्याने, त्यांनी पक्षाल सोडचिठ्ठी देत, विरोधी पक्षात प्रवेश केले आहेत. तर बहुतांश ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकूणच सध्या पूर्णपणे निवडणुकीचे वातावरण असून, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र प्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदाना सुरू होण्या अगोदरच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना तिकीट वाटपात गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

देवेंद्र प्रसाद यादव यांनी राजीनामा देताना, लालू प्रसाद यादव यांना एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, 'मी यापुढे राजदच्या धोरणाशी सहमत नसेल. राजद केवळ सत्ता गाजवण्यासाठीच धोरण अवलंबवत आहे. मात्र, नियम आणि धोरण यांच्यात समन्वय आवश्यक आहे. तत्त्वाशिवाय राजकारण म्हणजे आत्म्याशिवाय शरीर.

तसेच, झांझारपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुमन महासेठ यांना महाआघाडीचे उमेदवार बनवण्याबाबत त्यांची मोठी नाराजी असल्याचे समोर आल आहे. त्यांचे म्हणणे आहे की, झांझारपूरमधून समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर सहज विजय मिळवता आला असता, असे ते म्हणाले. झांझारपूरच नाही तर लोकसभेच्या इतर सहा-सात जागांसाठीही उमेदवार आयात केले गेले. या सर्व जागांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवार केले तर त्यांची कोणतीही तक्रार नव्हती.

मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या जागी झांझारपूरमधून जातीयवादी विचारसरणीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याच्या घटनेने आपण खूप दुखावलो असल्याचे यादव म्हणाले आहेत आणि माझं मन सांगत आहे की मी क्षणभरही राजदमध्ये राहू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT